Uday samant vs Raju shetty : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आज राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन आहे. आज दिवसभर चक्काजाम आंदोलन करून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. त्यावर आज उद्योग मंत्री उदय सामंत यांना विचारले असता, त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.
कोल्हापूरातून बोलताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वाभिमानीच्या आंदोलनावर भाष्य करताना म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे येण्यासाठी आज मोठमोठ्या नेत्यांचा ओघ वाढला आहे. पण आपण त्यामध्ये नाही हे दाखवण्यासाठी आणि सरकारला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची आंदोलनही करावी लागत आहेत.” अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला उदय सामंत यांचा टोला लगावला.
Trending
- विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाचा निकाल १०० टक्के
- यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या 95 टक्के पाऊस
- अणसूर – पाल हायस्कुलचा निकाल यावर्षीही १०० टक्के !
- डिगस माध्यमिक विद्यालयाचा निकाल १००%
- तळवडे श्री जनता विद्यालयाचा निकाल १०० टक्के
- फळे खाण्याचा कंटाळा आलायं, बनवा 3 रिफ्रेश ज्यूस ; जाणून घ्या रेसीपी
- ओटवणे रवळनाथ विद्यामंदिरचा दहावीचा निकाल ९६.५५ टक्के
- व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदाचा निकाल शंभर टक्के