बारा वर्षाखालील मुलांच्या वयोगटाची साई चषक आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा : बेळगाव स्पोर्ट्स क्लबकडून अर्जुन स्पोर्ट्स पराभूत

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित उद्योगपती रोहित पोरवाल पुरस्कृत बारा वर्षाखालील मुलांच्या साई चषक आंतर अकॅडमी क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी युनियन जिमखाना, सीसीआय, नीना व बेळगाव स्पोर्ट संघाने प्रतिस्पर्धानवर मात करून विजयी सलामी दिला. मोहम्मद अब्बास, लक्ष खतायत, स्वयं खोत, कृष्णा पिसे याना सामनावीर देण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर सकाळी झालेल्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे स्पर्धा पुरस्कर्ते रोहित पोरवाल यांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन करत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिमखाना उपाध्यक्ष संजय पोतदार, मिलिंद चव्हाण, मोहम्मद ताहीर सराफ, परशराम पाटील, प्रशांत लायंदर, रवी पिल्ले, अनिल गवी आदी मान्यवर उपस्थित होते.
पहिला सामन्यात युनियन जिमखाना संघाने अर्जुन स्पोर्ट संघाचा 170 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना युनियन जिमखाना संघाने 25 षटकात सात बाद 248 धावा केल्या फरहान शेखने सर्वाधिक 68, मोहम्मद हमजाने 66, शाहरुख धारवाडकरने 27, अतिथी भोगणने 23, अनिश तेंडुलकरने नाबाद 14 धावा केल्या. प्रत्युतरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्ट्स संघाचा डाव 78 धावात आटोपला. अर्णव यादवने 25 धावा केल्या. युनियन जिमखाना तर्फे मोहम्मद अब्बास याने पाच गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात बेळगाव स्पोर्ट्सने अर्जुन स्पोर्ट्स संघावर नऊ गडय़ानी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना अर्जुन स्पोर्ट्स संघाने 25 षटकात सात बाद 122 धावा केल्या. सलमान धारवाडकरंने 23, तनिष्क गौरगोंडा 18, अर्णव यादवने 16 धावा केल्या. बेळगाव स्पोर्टस तर्फे प्रीतम एमने 2 गडी बाद केले.
प्रत्युतरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स संघाने 12.2 षटकात एक गडय़ाच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले. आरुष पुत्रन व लक्ष खतायात यांनी प्रत्येकी 52 धावा केल्या.
तिसऱया सामन्यात सीसीआय संघाने एडिफाय संघावर नऊ गडय़ांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना एडीफाय संघाने 25 षटकात सात बाद 150 धावा केल्या. कौस्तुभने नाबाद 49 तर आर्याने 25 धावा केल्या सीसीआय तर्फे कलश बेनकट्टीने 2 गडी बाद केले. प्रत्युतरादाखल खेळताना सीसीआयने 17 षटकात एक गडय़ाच्या मोबदल्यात विजयाचे उद्देश गाठले. स्वयं खोत 54 व कलश बेनकटीने 46 धावा केल्या.
चौथ्या सामन्यात नीना संघाने युनियन जिमखाना ब संघावर सात गडय़ानी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना युनियन जिमखाना ब संघाने 24 षटकात सर्व बाद 150 धावा केल्या. अद्वैत पाटीलने 31 धावा केल्या. नीना तर्फे समर्थ चौगुलेने 3 रियान सलामवाले व हर्ष जाधव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युतरादाखल खेळताना निना संघाने 22 षटकात 3 गडीबाद 151 करून विजय मिळवला. कृष्णा पिसेने नाबाद 77 साईराज चव्हाणने 31 धावा केल्या युनियन जिमखाना ब तर्फे अद्वैत पाटीलने 2 गडी बाद
केले.