महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात पत्रकार परिषद
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघात मराठी भाषिकांची एकजूट आहे आणि मराठी भाषिक उमेदवारालाच निवडून देण्याचा निर्धार मराठी बांधवांनी केला आहे. तसेच इतर समाजहि मराठी भाषिकांसोबत आहेत, त्यामुळे भाजप आणि काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे मत उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर येळ्ळूरकर यांनी आज पत्रकार पाfरषदेत मांडले.
आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शुभम शेळके यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप आणि काँग्रेस हे एकाच माळेचे मणी आहेत. मराठी भाषिकांविरोधात दोघांचीहि भूमिका सारखीच आहे. हे पक्ष एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत असले तरी मराठी उमेदवाराला पाडण्यासाठी एकत्र येतात. हे याआधी महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण बेळगावकरांनी पाहिले आहे. यांचा मराठी द्वेश स्पष्ट आहे. त्यामुळेचे अमित शहा यांचा बेळगाव दौरा फ्लॉप झाला, असा आरोप येळ्ळूरकर यांनी यावेळी केला.
तसेच मराठी अस्मिता हा आपला मूळ उद्देश आहे. त्यासाठीच हि लढाई आहे. त्यामुळे मराठी बांधवांनी या निवडणुकीत हि एकी दाखविण्याची गरज आहे, अशी भावनीक साद त्यांनी यावेळी मराठी भाषीकांना घातली.