अमेरिकेतील शेअर बाजारातून अदानींचे समभाग वगळले ः देशातील बाजारात कंपनीचे समभाग 35 टक्क्यांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अदानी समूहा संदर्भात हिंडनबर्ग यांनी दिलेल्या अहवालावर मागील काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु आहे. यांचे पडसाद आता भारतीय संसदेपर्यंतही गेले आहेत. यावर विरोधीपक्षाने अदानी समूहाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. संसदेत शुक्रवारीही त्याचे पडसाद पहावयाला मिळाले आहेत.
याच दरम्यान अमेरिकेच्या डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स वगळण्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली या घोषणेच्या नकारात्मक परिणामुळे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. अदानी एंटरप्रायझेसमध्ये शुक्रवारी सकाळच्या सत्रात 35 टक्के मोठी घसरण होती इतर कंपन्यांचे शेअर्सही घसरले. गेल्या 10 दिवसांत त्यांच्या एकूण संपत्तीतून 52 अब्ज डॉलर्स इतक्या मोठय़ा रक्कमेचा तोटा झाल्याची माहिती आहे.
अदानी शेअर्स दिवसेंदिवस घसरत आहेत आणि त्यामुळे त्यांची संपत्ती सतत कमी होत आहे. या वर्ष 2023 मध्ये आतापर्यंत त्यांना 59.2 अब्ज डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला असून यापैकी 52 अब्ज डॉलर्स गेल्या 10 दिवसांत गमवावे लागले
आहेत.
हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी समूहाविषयी विविध दावे करण्यात आले आहेत ज्यात स्टॉक मॅनिपुलेशन-उर्फ… अकाउंटिंग फ्रॉडचा समावेश आहे. मीडिया स्टेकहोल्डरच्या विश्लेषणानंतर कारवाई करत, इंडेक्सने या सर्व आरोपांबाबत अदानी आणि कंपनीला काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अहवालानुसार, त्यांनो 7 फेब्रुवारीला डाऊ जोन्समधून बाजूला करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
एनएसईचा अदानींना झटका
अमेरिकेपूर्वी गौतम अदानी यांना राष्ट्रीय शेअर बाजारातून मोठा धक्का बसला आहे. स्टॉक मार्केटने अदानी ग्रुपच्या तीन कंपन्या अदानी एंटरप्राइजेस, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट्स यांच्यावर नजर ठेवली
आहे.
सेबीच्या कंपन्यांवर लक्ष ठेवण्याचा हा एक मार्ग आहे, जो गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी हाती घेतला जातो. अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यामुळे आता तिन्ही कंपन्यांवर लक्ष ठेवण्यात येणार असून हा निर्णय गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
अदानी आता पहिल्या 20 मधूनही बाहेर
जगातील अब्जाधीशांच्या यादीत (अब्जपतींची यादी) अदानी दुसऱया क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आणि नंतर चौथ्या क्रमांकावरून सातव्या आणि आता 21व्या स्थानावर घसरले आहेत. रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अमेरिकेतूनही नकारात्मक बातमी आल्यानंतर शुक्रवारी अदानी एंटरप्राइजेसचे समभाग 35 टक्क्यांनी कोसळले.
अदानी एंटरप्रायझेस डाऊ जोन्समधून बाहेर
आता अमेरिकेच्या डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून अदानी एंटरप्राइजेसचे शेअर्स वगळण्याची घोषणा करण्यात आली. कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे अदानीला डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.