भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सोशल मीडीया स्टार उर्फी जावेद (Urfi Javed) विऱोधआत आक्रमक पवित्रा घेत पत्रकार परिषद घेतली. माध्यमांसमोर बोलताना त्यांनी महिला आयोगावर निशाणा साधून मुंबईत नंगानाच करणाऱ्या उर्फी जावेद विऱोधआत महिला आयोग का भुमिका घेत नाही ? असा सवाल केला.
पत्रकार परिषदेदरम्यान चित्रा वाघ यांनी उर्फी यांच्या आडून राज्यातील महिला आयोगावर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “सोशल मीडीयावर व्हायरल होणाऱ्या उर्फीच्या अश्लील व्हिडिओंवर कारवाई का झाली नाही? महिला आयोग काय करत आहे? जनतेने उर्फीबरोबरच महिला आयोगालाही प्रश्न विचारण्याची गरज आहे. समाजात खूप घाण असून ती साफ करण्यासाठी कोणाला तरी हात घाण करावाच लागेल.” असे त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “उर्फी जावेदचा कोणता धर्म आहे हे महत्वाचे नाही. बरेच लोक म्हणतात की, चित्रा वाघने उर्फी मुस्लिम असल्यामुळे विरोध केला. पण ती कोणत्या धर्माची आहे याची मला पर्वा नाही. मी उर्फीच्या विरोधात नाही तर तिच्या कृतीविरोधात आहे. राजकारणी हा जातीय तेढ निर्माण करणारा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याची मला पर्वा नाही.” असेही त्या म्हणाल्या.
Trending
- ओडिशा अपघातात जवळपास 300 ठार
- शैक्षणिक वर्ष उद्यापासून सुरू
- अल्कारेझ, सोनेगो, स्वायटेक, चौथ्या फेरीत
- 200 मच्छिमारांची पाकिस्तानमधून सुटका अटारी-वाघा सीमेवर भारताच्या स्वाधीन
- नव्या योजनांची अंमलबजावणी करताना काळजी घ्या
- वटसावित्रीच्या पूर्वसंध्येला सत्यवानानेच घेतला सावित्रीचा बळी
- पहिल्या वनडेत अफगाणची विजयी सलामी
- फोंडा कदंब बसस्थानक परिसरात ‘बसपोर्ट’साठी जागेचे संपादन