हिवाळा आला की त्वचा कोरडी होते. आणि मग खोकला आणि सर्दी या समस्या तुमच्या शरीराला त्रास देतात. या सर्वांवर एक चांगला उपाय म्हणजे मध.चमकदार चेहऱ्यासाठी मध कसा वापरावा हे आज आपण जाणून घेऊयात.
सर्दी खोकला तसेच अनेक आजारांवर मध खाण्याचा सल्ला दिला जातो. पणनिरोगी शरीराबरोबर निरोगी त्वचेसाठी मध अधिक प्रभावी ठरतो.त्वचेमध्ये अनेक लहान रोमछिद्रे असतात. दिवसा त्या छिद्रांमध्ये धूळ साचते. त्यामुळे पुरळ उठते. मध नियमित वापरल्याने ही धूळ निघून जाते.ज्यांना मुरुमांचा त्रास वारंवार होत असतो त्यांनी मध आणि तूप चेहऱ्यावर लावल्याने ही समस्या काही दिवसांतच कमी होऊ शकते. वाढत्या वयात त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. अशावेळी मधाचा वापर केल्यास त्वचेच्या पेशी निरोगी राहून या सुरकुत्या दूर करण्यात मदत होते.मेकअप काढण्यासाठी अनेक लोक विविध कॉस्मेटिक उत्पादने वापरतात. या ऐवजी मध आणि ऑलिव्ह ऑईल वापरल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.लिंबाच्या रसामध्ये मध मिसळून लावल्यास त्वचा तेजस्वी आणि मुलायम होण्यास मदत होते.
(टीप : कोणताही उपचार करण्याआधी सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Trending
- दहिवडी पोलिसांकडून एका तासात जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस; दोघांकडून 1 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त
- शिवछत्रपतींनी कधीही भोसल्यांचं राज्य केलं नाही
- लग्नसोहळा असलेल्या घरातून दागिन्यांची चोरी
- पावसाची अद्याप दडीच
- दिल्ली पोलीस ॲक्शन मोडवर, ब्रिजभूषण सिंह यांच्या घरी 12 जणांची चौकशी
- साबांखामंत्री नीलेश काब्राल यांच्यावर काँग्रेसने केला घोटाळ्याचा आरोप
- विद्यालये गजबजली, मुले उकाड्याने हैराण!
- माझी वसुंधरा अभियानात ‘कराड’ राज्यात पहिले