प्रत्येकाला सुंदर,आणि तेजस्वी त्वचा आवडते. अशावेळी मुलतानी मातीचा देखील उपयोग केला जातो.मुलतानी माती चमकदार त्वचेसाठी खूप प्रभावी आहे.यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ राहते. चेहऱ्यावर जास्त फोड, मुरुम झाल्यामुळे होणारी जळजळ रोखण्यास मुलतानी माती खूप फायदेशीर आहे.आज आपण या मातीपासून घरच्या घरी पॅक कसे बनवायचे हे पाहणार आहोत.
त्वचेवर चमक आणण्यासाठी मुलतानी मातीचे घरगुती मास्क बरेच जण वापरतात आणि ते फायदेशीरदेखील असतात. हे घरगुती फेस पॅक खाली दिलेल्या टिप्स प्रमाणे तुम्ही वापरू शकता.
1. एका भांड्यात एक चमचा मुलतानी माती घ्या आणि त्यात थोडे गुलाबजल घाला. एकत्र मिसळा आणि गुळगुळीत पेस्ट बनवा.फेस पॅक चेहऱ्यावर आणि मानेला लावा. १०-१५ मिनिटे त्वचेवर राहू द्या. ताज्या पाण्याने ते धुवा. तेलकट त्वचेवर उपचार करण्यासाठी तुम्ही मुलतानी माती आणि गुलाबपाणीचा फेस पॅक आठवड्यातून २-३ वेळा वापरू शकता.
2. एका भांड्यात एक चमचा मुलतानी माती घ्या. त्यात एका ताज्या लिंबाचा रस घाला आणि साध्या पाण्याचे काही थेंब देखील घाला. सर्वकाही एकत्र मिसळा. हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा. १०-१५ मिनिटे राहू द्या. यानंतर ताज्या पाण्याने धुवा. मुरुम नैसर्गिकरित्या बरे करण्यासाठी तुम्ही या फेस पॅकचा वापर करू शकता.
3. एका बाउलमध्ये एक चमचा मुलतानी माती घ्या आणि त्यात एलोवेरा जेल घाला. ते एकत्र मिसळून फेस पॅक तयार करा. संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा. १०-१५ मिनिटे राहू द्या आणि ताज्या पाण्याने धुवा. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक वापरू शकता.
Previous Article…त्यापेक्षा दिल्लीत जाऊन सीमाप्रश्नी भूमिका मांडा
Next Article घराला अचानक लागली आग; दुकानही जळाले
Related Posts
Add A Comment