Various programs on the seventh anniversary of the installation of Sri Sateri Devi Shikhar Kalash
विर्डी येथील श्री महादेव मंदिर जीर्णोद्धार व शिखर कलश स्थापना आणि श्री सातेरी देवी शिखर कलश स्थापनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी रात्रौ ८ वाजता सुमारे १२० स्थानिक कलाकारांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जाणता राजा हा महानाट्य प्रयोग सादर होणार आहे.महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या विर्डी गावामध्ये नुकतीच श्री महादेव मंदिराची वास्तू उभारण्याचा संकल्प ग्रामस्थांनी पूर्ण केलेला आहे. या पार्श्वभूमीवर शिखर कलश स्थापना सोहळा बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एका नाटकाच्या माध्यमातून गावातील लहान मुलांपासून वयोवृद्ध स्त्री, पुरुष या सर्वांना एकाच वेळी रंगमंचावर आणता यावे यासाठी या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. सर्व भाविकांनी व नाट्य रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
दोडामार्ग – वार्ताहर