प्रतिनिधी
बांदा
Various religious programs on the occasion of Ram Navami in Saimatha in Banda Alwara!
बांदा आळवाडा येथील साईभक्त कै .बाप्पा केसरकर संस्थापीत साईमठामध्ये गुरूवार दि.३० मार्च २०२३ रोजी साई रामनवमी उत्सवा निमीत्त विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे५-३० वा. साईची काकड आरती, सकाळी ७-३०वा साई नित्य पुजा, सकाळी ९-०० वा. श्री सत्यदत्त पूजा,दु.१२-००साईची मध्यान्ह आरती, दु. १-३०वा महाप्रसाद व तिर्थ प्रसाद, सायं. ६-००साईची सांज आरती
रात्रौ ७-००वा. भजन, रात्रौ ९-०० साईची शेजारती याच कार्यक्रमात बुधवार दि.२९ मार्च २०२३ रोजी रात्रौ ७-३० वा. संगीत प्रेमीसाठी संगीत मेजवानी स्वरसंगम” गायक विठ्ठल केळुसकर,गितेश कांबळी, सौ सिध्दी परब, सिंथे नायजर महेद्र मांजरेकर,हार्मोनियम सुशांत नाईक,तबला प्रदीप वाळके,पखवाज कुणाल आळवे या सर्वाना भक्तगणानी या कार्यक्रमास उपस्थित राहुन श्री साईचे क्रुपाआशिर्वाद घावेत व तिर्थ प्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईबाबांचे भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर यानी केले आहे.