सेमीकंडक्टरची करणार निर्मिती
वृत्तसंस्था/ मुंबई
सेमीकंडक्टर व्यवसायाच्या माध्यमातून वेदांता ग्रुपला आगामी काळामध्ये तीन अब्ज डॉलर्सच्या उलाढालीचा व्यवहार करता येणार असल्याची शक्मयता वर्तवली जात आहे. यामध्ये एक अब्ज डॉलर्सची उलाढाल ही निर्यातीच्या माध्यमातून कंपनीला प्राप्त करता येणार असल्याचेही सांगितले जात आहे.
वेदांता कंपनीने फॉक्सकॉनसोबत सेमीकंडक्टर निर्मितीच्या करारावर नुकत्याच सह्या केल्या आहेत. संयुक्त कंपन्यांमार्फत सेमीकंडक्टरची निर्मिती ही आगामी काळात केली जाणार आहे. फॉक्सकॉनसोबत या संदर्भामध्ये एक करार करण्यात करण्यात आला असून आवश्यक ते तंत्रज्ञानही निर्मितीसाठी आत्मसात केले जाणार आहे. देशामध्ये सेमीकंडक्टर निर्मितीसाठी कारखाना प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त विद्यमाने सरकारकडे अर्ज करण्यात आला होता. वेदांतानेही या संदर्भामध्ये सरकारकडे निर्मितीकरता अर्ज केला होता. सेमीकंडक्टरच्या व्यवसायाच्या माध्यमातून साडेतीन अब्जची उलाढाल केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
2027 पर्यंत गुंतवणुकीचे नियोजन
2026-27 वर्षापर्यंतचे हे लक्ष ठेवण्यात आले आहे. या अनुषंगाने वेदांत ग्रुपने जवळपास 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे.