Versova Bandra Sea Link : एखाद्या गोष्टीचं स्कील महाराष्ट्रातील लोकांकडे नसेल तर त्याला राज्यातूनच काय परदेशातूनही मागवलं तर हरकत नाही, परंतु एका ठराविक शहरातच नोकरीची जाहिरात का देण्यात आली?, राज्यातल्या तरुण-तरुणींमध्ये स्कील असतानाही नोकरीची जाहिरात दुसऱ्या राज्यात कशी देण्यात आली? असा प्रश्न शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता आदित्य ठाकरेंनी वर्सोवा बांद्रा सी लिंक प्रकल्पावरून शिंदेंना लक्ष्य केलं आहे. त्यामुळं आता पुन्हा शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, वर्सोवा बांद्रा सी लिंकचं काम आता बंद पाडण्यात आलं आहे, या कामासाठी लागणाऱ्या अभियंत्यांसाठी तामिळनाडूतल्या चेन्नईत जाहिरात देण्यात आली आहे. राज्यातल्या तरुण-तरुणींमध्ये स्कील असतानाही नोकरीची जाहिरात दुसऱ्या राज्यात कशी देण्यात आली? शिंदे सरकार राज्यातील भूमिपुत्रांचं नुकसान करत असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
Previous Articleन्हावाशेवा बंदरावर 1725 कोटींचे हेरॉईन जप्त
Next Article रामदास कदमांविरोधात शिवसेनेचे ‘जोडे मारो’ आंदोलन
Related Posts
Add A Comment