ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Video of 60 female students taking a bath goes viral in Chandigarh University पंजाबच्या चंदीगढ विद्यापीठात मुलींच्या वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थीनीने तब्बल 60 विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन ते इंटरनेटवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे मध्यरात्री दोनच्या सुमारास विद्यापीठात गदारोळ माजला. विद्यापीठाच्या गेट नंबर 2 वर पीडित विद्यार्थीनींनी निदर्शने करत कारवाईची मागणी केली. यावेळी आठ विद्यार्थीनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.
चंदीगढ विद्यापीठात मुलींच्या वसतीगृहात राहणारी विद्यार्थीनी मागील काही दिवसांपासून वसतिगृहातील विद्यार्थीनींचे छुप्या पद्धतीने आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. हे व्हिडिओ ती एका मुलाला पाठवत होती. तो मुलगा हे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करायचा. संबंधित विद्यार्थिनीची ओळख पटली असून, वसतिगृहात विद्यापीठ प्रशासनानं इतर विद्यार्थिनींसमोर तिची चौकशी केली. तिने केल्याल्या कृत्याची कबुली दिली आहे. ती ज्या मुलाला ती हे व्हिडिओ पाठवत होती तो शिमलाचा रहिवासी आहे. मात्र, अद्यापपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल किंवा अटक करण्यात आलेली नाही. संबंधित आरोपी विद्यार्थीनीवर हल्ला होऊ नये म्हणून तिला वसतिगृहाच्या रुममध्ये बंद करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, हे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर 8 पीडित विद्यार्थीनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामधील एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी करत आहेत.