नीयत चित्रपटात मुख्य भूमिका
अभिनेत्री विद्या बालनने स्वतःच्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. विद्या बालन आता ‘नीयत’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनू मेनन करत आहेत. विद्याने सोशल मीडियावर एक छायाचित्र शेअर करत चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाल्याची माहिती दिली आहे.

‘नीयत’ हा सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला चित्रपट असेल. याचे चित्रिकरण इंग्लंडमध्ये सुरू झाले आहे. विद्याने प्रसारित केलेल्या छायाचित्रात दिग्दर्शिका अनू मेनन देखील दिसून येत आहेत. ‘स्वतःच्या पसंतीच्या लोकांपैकी काही जणांसोबत अलिकडच्या काळात वाचलेल्या सर्वात आकर्षक पटकथांपैकी एकाचे चित्रिकरण सुरू करण्यास उत्साही आहे’ असे विद्याने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.
मागील काही काळापासून विद्याचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. आता ‘नीयत’ चित्रपट देखील अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रा यांची ‘एबंडेन्शिया’ ही कंपनी कर आहे. विद्या बालनसोबत या चित्रपटात शहाना गोस्वामी, शशांक अरोरा, नीरज काबी, राम कपूर, मीता वशिष्ठ, अमृता पुरी आणि प्राजक्ता कोळी दिसून येणार आहे.