जत,प्रतिनिधी
जत येथील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित चार आरोपींना 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.आज पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना आणखीन चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिसांनी तपासासाठी सात दिवसांची कोठडी मागितली होती,पण न्यायालयाने चार दिवसांची कोठडी दिली आहे.
दरम्यान,माजी नगरसेवक विजय ताड यांचा खून हा माजी नगरसेवक उमेश सावंत यांनी सुपारी देऊन केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.परंतु सावंत हे पोलिसांच्या हाताला अजून लागलेले नाहीत.यामुळे ताड कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. विजय ताड यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारास तातडीने अटक करावी अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व कुटुंबीय आत्मदहन करू,असा इशारा विक्रम ताड यांनी दिला आहे.तसे निवेदन ही पोलीस प्रमुख,जिल्हाधिकारी,मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही देण्यात आले आहे.
जत पालिकेचे भाजप माजी नगरसेवक विजय ताड यांची (दि-17) मार्च रोजी सांगोला रोडवरील अल्फोंसा स्कूल येथे गावठी पिस्तूल मधून गोळ्या झाडून व दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती.या घटनेने संपूर्ण तालुका हादरला होता. हा खून कोणत्या कारणातून झाला याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते,तसेच आरोपीच्या मुसक्या आवळणे देखील पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.जिल्हा पोलीस प्रमुख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला होता.
रविवार दिनांक 19 रोजी रात्री उशिरा या खून प्रकरणी चार संशयित आरोपींना कर्नाटकातील गोकाक येथून ताब्यात घेण्यात आले होते.त्यानंतर पोलीस प्रमुखांनी पत्रकार बैठक घेत चारही आरोपींची नावे निष्पन्न करून यात मुख्य सूत्रधार म्हणून माजी नगरसेवक उमेश सावंत यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट केले.त्यानंतर आरोपी संदीप उर्फ बबलू चव्हाण,किरण चव्हाण,आकाश व्हणकांडे तिघेही रा.जत तर निकेश उर्फ दाद्या मदने राहणार कसबे डिग्रज ता. मिरज जि.सांगली यांना जत न्यायालयासमोर उभे केले असता कोर्टाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.सोमवार (दि- 27) रोजी आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयाने दिनांक 31 मार्च पर्यंत त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.याप्रकरणी आरोपींच्या वतीने जत येथील वकील ए .जी. रेऊर व सुप्रभा महाजन यांनीही काम पाहिले. तर सरकारी वकील म्हणून डी. डी.पाटील यांनी काम पाहिले.
तीन गावठी पिस्टल व दोन वाहने ताब्यात
विजय ताड खून प्रकरणाचा तपास सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे. पोलिसांनी या तपासात संशयीत आरोपींकडून चार गावठी पिस्तूल व दोन दुचाकी वाहने जप्त केले आहेत. आरोपींनी हे तीन गावठी पिस्टल मध्यप्रदेशातून आणल्याची कबुली दिली असल्याचे सांगण्यात आले.
Trending
- श्रीलंका – अफगाण एकदिवसीय मालिका आजपासून
- स्पोर्ट्स mania
- रीबाकिना, जोकोविच, अल्कारेझ तिसऱ्या फेरीत
- आजचे भविष्य 2 जून 2023
- भारत-पाकिस्तान जेतेपदासाठी आमनेसामने
- त्रिपुरा क्रिकेट संघटनेच्या सल्लागारपदी क्लुसनर
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीसाठी इशान किशनकडून जोरदार सराव
- ऑस्ट्रेलियाला धास्ती ओव्हलवरील खराब कामगिरीची