चौकशीच्या नावाखाली पॉश कारने जातो घरी : आंघोळ, सुग्रास भोजन करुन येतो कोठडीत

प्रतिनिधी /म्हापसा
अभिनेत्री तथा भाजपानेत्या सोनाली फ्ढाsगट खूनप्रकरणी पाच जणांना अटक झाली आहे. त्यातील तिघा स्थानिक संशयितांपैकी एकाला हणजूण पोलीस स्थानकात ‘व्हीआयपी’ पाहुणचार मिळत असल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे. चौकशीच्या बहाण्याने त्याला रोज पॅन्टिनमध्ये नेउढन तेथून मागील दरवाजातून बाहेर काढून ‘पॉश’ खाजगी कारमधून घरी नेऊन आंघोळ, नाश्ता, भोजन करून पुन्हा कोठडीत आणले जाते, अशी माहिती खुद्द पोलीस सूत्रांकडूनच मिळाली आहे.
पोलिसांना या खुनाच्या तपासकार्यात दिवसेंदिवस वेगवेगळे मुद्दे सापडत आहेत. सोनालीचे मारेकरी म्हणून हणजूण पोलिसांनी फोगट यांचा सचिव सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांना अटक केली. त्यानंतर ड्रग्ज पॅडलर म्हणून कर्लिज हॉटेलचा मालक एडवीन नुनीस, दत्तप्रसाद गांवकर, रामदास उफ्ढ& रामा मांद्रेकर या तिघा स्थानिकांना अटक केली. अटक केलेल्या या तिघा गोमंतकीय संशयितांपैकी एकाची पोलिसांशी अगोदरच देवाण-घेवाण होत होती. शिवाय राज्यात कुणीही पोलिसांचा व्हीआयपी अधिकारी आल्यास हा संशयितच त्यांची उठबस करत होता, अशी माहिती मिळाली असून याच ‘घरोब्या’मुळे आता पोलिसांनी त्या संशयिताला पोलीस कोठडीत असतानाही अतिमहनीय व्यक्तीच्या सुविधा पुरविल्याचे उघड झाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी
ड्रग्स पॅडलर्सशी पोलिसांचे साटेलोटे असून राज्यासाठी ही घातक गोष्ट आहे. हणजूण पोलीस स्थानक इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. या संशयिताला कोठडीतून कितीवेळा बाहेर काढले, चौकशीसाठी पॅन्टीनमध्ये कोठे बसविले, तेथे संशयिताला अतिमहनीय व्यक्तीप्रमाणे कितीवेळ चौकशी झाली व भोजन झाले याची कसून तपासणी होणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेण्याची गरज आहे.
वरिष्ठांकडून चौकशी व्हावी
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पॅ†िन्टनच्या मागील दरवाजातून एक खाजगी कार यायची. त्या कारमध्ये पोलीस अधिकाऱयांच्या मर्जीतील दोन विश्वासू पोलीस असत. त्या संशयितास घरी नेऊन त्याने चहापान, आंघोळ, भोजन केल्यानंतर पुन्हा आणून कोठडीत ठेवले जात असे. हा सर्वप्रकार चौकशीच्या नावाखाली चालू होता. याची गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांमाफ्&ढत कसून चौकशी होणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया काही पोलीस व नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हणजूण, कळंगूट, पेडणे आदी किनारी भागात पोलीसस्थानकावर उपअधीक्षक, निरीक्षक पदासाठी महिन्याचा हप्ता 35 ते 40 लाखापर्यंत देण्याच्या अटीवर बोली लावली जाते, अशी माहिती मिळाली आहे. मात्र ते पैसे नेमके कुणाला वा कुठपर्यंत पोचतात हा वेगळा विचार करण्याची गोष्ट आहे. या किनारीभागात मोठय़ा प्रमाणात क्लब, मसाजपार्लर, अतिमहनीय अलिशान हॉटेल्स असून त्यातील अनेक ठिकाणी अमलीपदार्थांचा मोठय़ा प्रमाणात व्यवहार होत असल्याचा संशय स्थानिकांना आहे. विशेष म्हणजे पोलिसांवर ड्रग्स पॅडलरचा आशीर्वाद असल्यानेच हे सर्व काही अगदी सोपे झाले आहे, अशी माहिती हाती आली आहे. या भागात तीन वर्षे राहणारा अधिकारी सुमारे 7 ते 8 कोटी रुपये घेउढन जातो. एका अधिकाऱयाने तर अवघ्या चार महिन्यात हणजूण भागात जमीन घेउढन अलिशान बंगला उभारला असल्याचीही चर्चा असून या सर्व प्रकारांची सखोल चौकशी होण्याची गरज सुजाण नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
हणजूण पोलिसस्थानकातील छोटू
हणजूण पोलीस स्थानकामध्ये छोटू नामक हवालदार किनारी भागातील मासिक ‘देणग्या’ गोळा करतो. त्याची बदली हणजूणहून आगशी येथे 2020 साली झाली होती. मात्र या हवालदारावर वरपर्यंतच्या अधिकाऱयांची कृपा आणि आशीर्वाद असल्याने तो छोटू बदली होऊनही हणजूण पोलीस स्थानकातच ठाण मांडून बसला आहे. काही ड्रग्स पॅडलर्सची त्याच्याबरोबर ये-जा असते, अशी माहिती मिळाली आहे. सर्व ड्रग्स पॅडलर्सच्या मुसक्या आवळल्या जातील असे मुख्यमंत्री डॉ. सावंत सांगतात. मात्र असे अधिकारी असल्यामुळे ड्रग्स पॅडलरांच्या मुसक्या आवळणे कठिण काम आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
हैदराबाद पोलिसांचे आरोप निराधार

पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांची माहिती
अमलीपदार्थ तस्करीशी संबंधित प्रकरणात हैदराबाद पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी केलेले आरोप निराधार असल्याची प्रतिक्रिया गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी व्यक्त केली आहे.
अमलीपदार्थ तस्करीशी संबंधित तपास आणि अटक प्रकरणात गोवा पोलीस सहकार्य करत नसल्याचे आरोप हैदराबाद पोलीस आयुक्तांनी केले होते. त्यासंबंधी रविवारी पत्रकारांनी सिंग यांची भेट घेतली असता त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्यक्षात हैदराबाद पोलिसांनी गोवा पोलिसांकडे कधी सहकार्य मागितलेच नव्हते. अशावेळी असहकार करण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगून सिंग यांनी हैदराबाद पोलीस आयुक्त दिशाभूलकारक आणि गोव्याची बदनामी करणारी वक्तव्ये करत असल्याचे म्हटले. याप्रश्नी आपण सदर पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असून त्यांनी गोवा पोलिसांकडे मागितलेल्या सहकार्यासंबंधीच्या पत्रव्यवहाराची माहिती देण्यास सांगितले आहे, असे सिंग यांनी सांगितले.
गोव्यावर नाहक, तथ्यहिन आरोप
आंतरराज्य गुन्हेगारी कशी हाताळावी याची पूर्ण जाणीव गोवा पोलिसांना आहे. अनेक गुह्यांशी संबंधित तपासासाठी आम्हीही आमची पोलीस पथके अन्य राज्यात पाठवत असतो. त्यावेळी कधी सहकार्य मिळते तर कधी मिळत नाही. परंतु आम्ही कधीच अशाप्रकारे एखाद्या राज्यावर असहकार्याचे आरोप केलेले नाहीत.
आम्हीच माहिती दिली तेलंगण पोलिसांना
अमलीपदार्थ तस्करीत गुंतल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या एडविन न्युनिसची तपासणी सुरू असताना त्याचा हैदराबाद येथेही तस्करीत सहभाग असावा असे दिसून आले होते. त्याबद्दल आम्ही लगेच तेलंगण पोलिसांना माहिती दिली होती व तपासणीसाठी गरज भासल्यास सदर संशयिताचा ताबा तुमच्याकडे देऊ शकतो, असे कळविले होते. एवढे असूनही हैदराबाद पोलीस आयुक्तांनी ईमेलच्या माध्यमातून उलट आमच्यावरच आरोप केले. त्यावेळी आम्ही कोणकोणत्या प्रकरणात गोवा पोलिसांकडून सहकार्य मिळाले नाही त्याची माहिती देण्यास सांगितले. परंतु आजपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. एवढेच नव्हे तर आजपर्यंत कधीच हैदराबाद आयुक्तांनी आपणाशी किंवा महानिरीक्षकांशी बोलणीसुद्धा केलेली नाही, असे सिंग यांनी स्पष्ट केले.
अन्य राज्यातील पोलीस एखाद्या गुन्हेगारास पकडण्यासाठी येथे आले तरी ते आम्हाला कळविल्याशिवाय त्याला परस्पर उचलून नेऊ शकत नाही. तसे करणे बेकायदेशीर ठरते. कारण तसे घडल्यास संबंधित व्यक्तीचे कुटुंबीय वा नातलग त्याच्या बेपत्ता होण्यासंबंधी किंवा अपहरण झाल्याची तक्रार देऊ शकतात. अशा गुन्हेगारास पकडून नेताना एकापेक्षा जास्त राज्यांच्या सीमा पार कराव्या लागल्यास तेथील पोलिसही सदर पोलिसांना जाब विचारू शकतात, असे सिंग म्हणाले.
शुक्रवारी पोलिसांनी फेटाळले होते आरोप
दरम्यान, हैदराबाद पोलीस आयुक्तांनी केलेले असहकार्याचे आरोप दोन दिवसांपूर्वीच गोवा पोलिसांनी फेटाळले होते. त्यासंबंधी शुक्रवारी पोलीस मुख्यालयातून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले होते. त्यात गोवा पोलिसांनी हैदराबाद पोलिसांनाच नव्हे तर कोणत्याच राज्याकडून आलेल्या विनंतीस कधीच नकार दिलेला नाही, असे स्पष्ट केले होते.