नवी दिल्ली
विवो कंपनीने आपला नवा वाय 75 हा स्मार्टफोन नुकताच बाजारात लाँच केला आहे. याची किंमत जवळपास 21 हजार रुपये इतकी असणार असून 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह सदरचा फोन येणार आहे. 6.44 इंचाचा अमोलेड डिस्प्ले या फोनला असणार असून 4050 एमएएच क्षमतेची बॅटरी तसेच 44 वॅटचा चार्जर असणार आहे. मुख्य कॅमेरा 50 मेगा पिक्सल क्षमतेचा असेल.