Sindhudurg Crime : . देवमासा अर्थात व्हेल माशाच्या उल्टीच्या तस्करी प्रकरणी देवगडमध्ये सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून २२ कोटी रुपयांच्या मुद्देमालासह दोन गाड्या जप्त केल्या आहेत.सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषणने ही कारवाई केली आहे. १२ किलो ३७० ग्रॅम वजनाची ही उलटी असून तिची किंमत तब्बल २२ कोटी ३७ लाख रुपये इतकी आहे.
व्हेल माशाच्या उल्टीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी
व्हेल मासा हा पृथ्वीवरील असा जीव आहे, ज्याच्या उलटीला तरंगणारे सोने म्हणतात. त्याला अॅम्बरग्रीस असेही म्हटले जाते. तज्ञांच्या मते, व्हेल मासे समुद्रातील अनेक गोष्टी खातात. त्यांना अपचन झाले की ते उल्टी करतात. म्हणजेच त्याला व्हेलची विष्ठा ही म्हटले जाते. अॅम्बर एक मेणासारखा पदार्थ आहे जो संरक्षित शुक्राणू व्हेलच्या पचनमार्गातून तयार होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि किंमतही जास्त आहे.अॅम्बरग्रीसचा वापर परफ्यूम तयार करण्यासाठी केला जातो ज्यामध्ये कस्तुरीचे कण असतात. पूर्वीच्या काळी संस्कृतींमध्ये खाद्यपदार्थ, अल्कोहोलयुक्त पेये आणि तंबाखूमध्ये चव येण्यासाठी त्याचा वापर केल्याच्या नोंदी आहेत. पण सध्या यासाठी ते क्वचितच वापरले जाते.म्हणूनच त्याला प्रचंड मागणी आहे.
Previous Articleसुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा..हे तर लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम- रविकांत वरपे
Next Article गोवावेसजवळ खासबाग येथील वृद्धेला लुटले
Related Posts
Add A Comment