प्रतिनिधी/ सातारा
राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार हे बऱयाच दिवसांच्या कालावधीनंतर सातारा जिह्याच्या दौऱयावर येत आहेत. ते जेव्हा जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या उपस्थितीत राजकीय घडामोडी घडत असतात. सातारा मुक्कामी ते रविवारी येत आहेत. त्यांच्या समोरच कोणाला मिळणार शाबासकी तर कोणाची होणार कानटोचणी हे बघायला मिळणार आहे. पवारसाहेब जिह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांना नेमका कोणता कानमंत्र देणार हे पहायला मिळणार आहे.
शरद पवारसाहेब हे बऱयाच दिवसांनी साताऱयाच्या दौऱयावर येत आहेत. यापूर्वी साताऱयातून राष्ट्रवादीचे जनसंवाद यात्रा गेली असून त्या यात्रेमध्ये जिह्यातील राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य आणण्याचे काम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यानंतर पवारसाहेबांचा दौरा होत आहे. पवारसाहेब हे रविवारी दुपारी 2 वाजता पुण्याहून आपल्या वाहनाने साताऱयात शासकीय विश्रामगृहात पोहचणार आहेत. तेथे रयत शिक्षण संस्थेच्या अनुषंगाने बैठक चालणार आहे. रात्री शासकीय विश्रामगृहात मुक्काम असून पवारसाहेब येणार असल्याने जिह्यातील पक्षातील सर्वच नेते मंडळी आर्वजून शासकीय विश्रामगृहावर गर्दी करणार आहेत. तेथे रयत शिक्षण संस्थेची बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या जिह्यातील नेत्यांना नेमक्या कोणत्या सुचना देणार तर काही नेत्यांची कानटोचणी करणार हे पहायला मिळणार आहे. त्यानंतर दि. 9 रोजी सकाळी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. पुन्हा रयत शिक्षण संस्थेची कौन्सीलची बैठक होणार आहे. त्यानंतर जकातवाडी येथील कॉलेजच्या कार्यक्रमाला ते जाणार आहेत. दरम्यान, या सगळया दौऱयात त्यांच्यावर प्रेम करणारे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची भेट घेण्यासाठी आर्वजून गर्दी करणार आहेत. तर पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तयारी केलेली आहे.