12 हजार एकरातील जंगल जळून खाक
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील जंगलांमध्ये भीषण आग लागली आहे. योशमिते नॅशनल पार्कनजीक लागलेल्या आगीत 12 हजार एकरातील जंगल जळून खाक झाले आहे. तर सुमारे 3 हजार लोक बेघर झाले आहेत. जंगलात वेगाने फैलावत असलेल्या आगीमुळे 6 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॅलिफोर्नियाच्या मारिपोसा काउंटीमध्ये गव्हर्नर गेविन न्यूजॉम यांनी आणीबाणी लागू केली आहे.
कॅलिफोर्नियाच्या जंगलांमधील यंदा लागलेली ही सर्वात भीषण आग आहे. आगीची तीव्रता पाहता 2 हजारांहून अधिक घरांना रिकामी करविण्यात आले आहे. तर परिसरातील 10 इमारतींना आगीने वेढले आहे. आगीचे संकट पाहता अनेक उद्योगांचा वीजपुरवठा रोखण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 400 हून अधिक अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. 4 हेलिकॉप्टर्सचीही मदत घेतली जात आहे.
अग्निशमन अधिकाऱयानुसार मिडपाइंस शहरानजीक नॅशनल पार्कच्या दक्षिण-पश्चिम क्षेत्रात शुक्रवारी दुपारी आग लागली होती. शनिवारपर्यंत ही आग समारे 48 चौरस किलोमीटर क्षेत्रापर्यंत फैलावली.