बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोन केवळ स्वतःचा अभिनय नव्हे तर सौंदर्यासाठीही ओळखली जाते. दीपिकाने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दीपिका प्रोफेशनल लाइफसह स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यावरूनही चर्चेत असते. चाहते तिच्याशी निगडित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. दीपिकाने आता भारतीयांसाठी हॉलिवूडमध्ये होत असलेल्या रेशियल स्टीरियोटाइप्सच्या विरोधात आवाज उठविला आहे. रेशियल स्टीरियोटाइप्सवरून दीपिकाने स्वतःचा अनुभव मांडला आहे.

दीपिकाने 2017 मध्ये अभिनेता विन डिजलसोबत एका हॉलिवूडपटामध्ये काम केले होते. या चित्रपटाद्वारे दीपिकाने हॉलिवूडला स्वतःच्या अभिनयाची क्षमता दाखवून दिली होती. परंतु दीपिकाने आता हॉलिवूडच्या रेशियल स्टीरियोटाइपवरून स्वतःचा अनुभव सांगितला आहे. हॉलिवूडमध्ये बाहेरील देशांमधून आलेल्या कलाकारांसोबत भेदभाव होत असल्याचे तिचे म्हणणे आहे.
अमेरिकेत गेल्यावर मला काहीतरी असे ऐकावे लागते, ज्यामुळे दुःखी व्हायला होते. हॉलिवूडमध्ये पुन्हा परतण्याचा माझा विचार नाही. माझी ओळख एक कलाकार म्हणुन आहे. परंतु तेथे अन्य देशांच्या कलाकारांबद्दल चांगले बोलले जात नसल्याचे दीपिकाचे म्हणणे आहे.