वारणानगर, प्रतिनिधी
रविवार (दि.२६) रोजी जोतीबा खेटेवारी दरम्यान जोतीबा मंदिर बाहेरील गाभाऱ्यात श्री च्या दर्शन रांगेत असणाऱ्या गर्दीचा फायदा घेवून भाविकांच्या खिशात हात घालून पैसे चोरणाऱ्या भारती मदन महाजन, वय ५२, रा.गडमुडशिंगी, जि. कोल्हापुर या महिलेस कोडोली पोलीसांनी अटक केली आहे.
इंचलकरजी येथील भाविक तुकाराम मलकाजी जवळगी हे दुपारी ३ वा देवदर्शनासाठी आले असता गाभाऱ्यातील दर्शन रांगेत असलेल्या गर्दीचा फायदा घेवून आरोपी महिला भारती हिने त्यांच्या खिशातील रोख रक्कम १२ हजार रु ची चोरी केली होती.
कोडोली पोलीसांना याबाबत चॉकलेटी रंगाचा स्कार्फ व हिरव्या रंगाची साडी घातलेली माहिला एवढेच वर्णनाची माहिती फिर्यादी व इतर भाविकाकडून मिळाली होती. त्याआधारे पोलीसांनी तत्काळ तपासाला सुरवात करून देवस्थान समितीचे मंदीरातील सिसीटीव्हीचे फुटेज देवस्थानचे तंत्रज्ञ राहुल जगताप यांच्या तांत्रिक तपासाच्या साहाय्याने तपास करून हा गुन्हा लगेच उघडकीस आणला. तात्काळ या महिलेचा शोध घेवून तिला ताब्यात घेवून तिच्याकडून गुन्ह्यातील चोरीची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. कोडोली पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक एस.ए. डोईजड, पोलीस हावलदार मधुकर परीट तपास करित आहे.
Previous ArticleShirol Crime News : शिरोळचे मुख्याधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
Related Posts
Add A Comment