World Alzheimer’s Day 2022 : आज जगभरात अल्झायमर दिवस साजरा केला जात आहे. रोगाचा वाढता धोका टाळण्यासाठी आणि यावर प्रतिबंध करता यावे. या रोगाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी अल्झायमर रूग्णांमध्ये वाढ होतच असते. यंदाही जगात ५५ दशलक्षाहून अधिक लोक अल्झायमर रोगाने ग्रस्त आहे. २०३० पर्यंत ही संख्या ७८ दशलक्ष होण्याची शक्यता आहे. तर २०५० पर्यंत जगभरात या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या १३९ दशलक्षांपेक्षा जास्त असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीत हे सांगण्यात आले आहे. यावरून अल्झायमरचा आजार किती प्रमाणात वाढत आहे याचा अंदाज बांधता येतो.
२०५० पर्यंत भारतात १.४० कोटी रुग्णांची वाढ
भारतात अल्झायमर रोगाने ग्रस्त रुग्णांची संख्या ६० लाखांहून अधिक झाली आहे. २०५० पर्यंत ही संख्या १.४० कोटी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यावरून जगात आणि भारतात अल्झायमरचा आजार किती पसरला आहे याचा अंदाज लावता येतो. एका अहवालानुसार, सध्या अमेरिकेत ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे ६५ लाखांहून अधिक रुग्ण अल्झायमर आजाराच्या विळख्यात आहेत. ही परिस्थिती भारतापेक्षा वाईट आहे.
अल्झायमरमुळे व्यक्तीची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती नष्ट होते
तज्ञांच्या मते, मेंदूतील महत्त्वाच्या पेशी अल्झायमर रोगात मरतात. त्यामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती कमजोर होते. या आजाराची लक्षणे वयाच्या ५०-६० व्या वर्षी दिसू लागतात. आत्तापर्यंत असा कोणताही अभ्यास नाही ज्यामध्ये अल्झायमर रोग ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांमध्ये दिसला असेल. ते म्हणतात की ८०-८५ वर्षांच्या वयात गोष्टी विसरणे, भ्रम होणे सामान्य आहे. जगभरात ज्याप्रमाणे वृद्धांची संख्या वाढत आहे, त्याचप्रमाणे अल्झायमरही आपले पाय पसरत आहे. फोन उचलण्यापासून ते जेवण खाण्यापर्यंतच्या गोष्टी जर तुम्ही विसरत असाल तर त्याला हलके घेऊ नका आणि लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. अल्झायमर रोगामुळे व्यक्तीची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता नष्ट होते आणि त्याचे वर्तन बदलते.
Previous ArticleSatara : आई व बछड्याची अखेर भेट ! वनविभागाची मोहिम यशस्वी
Related Posts
Add A Comment