World Diabetes day : मधुमेह ही एक गंभीर आरोग्य समस्या असून या समस्येने जगभरातील लोकांना या समस्येने ग्रासले आहे. 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणुन पाळला जातो. या दिवशी लोकांमध्ये मधुमेहाची लक्षणे, उपचार, आणि त्यासंबंधीची जागरूकता करण्यात येते. तसेच हा दिवस उत्तम आरोग्य आणि निरोगी जिवनशैली राखण्यासाठी तसेच मधुमेहाशी एकत्रितपणे लढण्यासाठी सार्वजनिक शिक्षण देण्यावर भर दिला जातो.
मधुमेहाचे व्यवस्थापन करताना आपल्या आहारात कमी GI पदार्थ म्हणजे साखर नियंत्रण करणारा आहार हा अधिक फायदेशिर ठरतो. या पदार्थाने अचानक साखर वाढण्यास प्रतिबंध होऊन ते नियंत्रित ठेवले जाते. य़ामध्ये स्टार्च नसलेल्या भाज्या जसे, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या, गाजर तसेच वेगवेगळी प्रथिनयुक्त धान्यांचे आपल्या आहारामध्ये सेवन करणे गरजेचे आहे.
मधुमेहाविरूद्ध लढण्यासाठी आहारामध्ये जसा अनेक अन्नधान्यांचा, फळांचा, पालेभज्यांचा वापर कला जातो तसा उपयोग काही बहुपयोगी बियांचा वापर सुद्धा फायदेशिर ठरतो. या बिंयामुळे जेवणाचे पौष्टिक मुल्य वाढून रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्य़ास प्रतिबंध करतात. तसेच यामुळे आहारामध्ये चविष्टपणावाढून मधुमेही पोठभर जेऊ शकतात.
आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आश्चर्यकारक असा बिया पुढीलप्रमाणे

मेथीच्या बिया (मेथीचे दाणे) : मेथीमुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. मेथीच्या बियांमध्ये फायबर “गॅलेक्टोमनन” हा विरघळणारा एक महत्त्वाचा घटक आहे. जो कार्बोहायड्रेट्सचे पचन आणि साखरेच्या शोषणाचा वेग कमी करतो. त्यामुळे मधुमेहींमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. यासाठी मेथी चांगली भाजून त्याची पावडर तयार करून ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा घ्यावी. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो.

ओवा किंवा अजवाईन : जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर ओवा खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असणाऱ्य़ा उच्च फायबरमुळे मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी गुणकारी ठरतात. ओवा किंवा अजवाईनच्या बिया रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. या बियांमध्ये असणाऱ्या दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट घटकांमुळे चयापचय सुधारते. एक चमचा ओवा एक कप पाण्यात उकळून गाळून घ्या आणि जेवल्यानंतर सुमारे 50 मिनिटांनी त्याचे सेवन करा.

सब्जा बिया : सब्जा बियांमध्ये भरपूर फायबर असते. मधुमेहाच्या रूग्णांना जेवणाआधी नेहमी सब्जा बिया दिल्यामुळे रक्तातील ग्लुकोजची वाढ रोखली गेली. सब्जा बिया टाइप- 2 मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये साखरेची पातळी राखण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचे संशोधनात आढळले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मधुमेहाने ग्रस्त असलेले रुग्ण आहारामध्ये सब्जाचा समावेश करू शकतात.

जवस किंवा फ्लेक्स सीड्स : मधुमेही रुग्णांसाठी हे खुपच फायदेशीर असून त्यामध्ये भरपूर अविरघळणारे फायबर असतात ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास तसेच आपल्या आतड्याच्या आरोग्याची काळजी घेतात. अभ्यासानुसार, जवसाच्या बियांमुळे टाइप-1 तसेच टाइप- 2 मधुमेह टाळला जाऊ शकत
टिप : वरिल माहीती साधारण माहीतीवर अवलंबून असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय करावेत.