World Ozone Day 2022 : ओझोन थराचे महत्त्व आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी १६ सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. सध्या जागतिक हवामान बदल व उष्णतावाढीच्या पार्श्वभूमीवर ओझोन वायू वाचवणे गरजेचे आहे असे ट्विट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केले आहे. आज जागतिक ओझोन दिनाचा इतिहास आणि महत्त्व आपण जाणून घेणार आहोत.
ओझोन थराच्या संरक्षणासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने (UNGA) १६ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला. १६ सप्टेंबर १९८७ रोजी युनायटेड नेशन्स आणि इतर ४५ देशांनी ओझोन थर कमी करणाऱ्या पदार्थांवरील मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली. जागतिक ओझोन दिवस १६ सप्टेंबर १९९५ रोजी पहिल्यांदा साजरा करण्यात आला. ओझोन थर कमी होण्यास जबाबदार असलेल्या पदार्थांचे उत्पादन कमी करून ओझोन थराचे संरक्षण हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा उद्देश आहे.
ओझोन थर हा ऑक्सिजन इतकाच महत्त्वाचा असतो. ओझोन थर सूर्यापासून उद्भवणार्या हानिकारक अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो. सूर्यापासून निघणाऱ्या या किरणांमुळे त्वचेचे अनेक आजार उद्भवू शकतात.
‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल @ ३५: पृथ्वीवरील जीवनाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक सहकार्य’ ही आहे. १९७० च्या उत्तरार्धात ओझोनच्या थराला छिद्र असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला होता. यानंतर ८०च्या दशकात, जगभरातील अनेक सरकारांनी या समस्येवर विचार करण्यास सुरुवात केली.
ओझोन हा जीवनरक्षक वायू आहे. सध्या जागतिक हवामान बदल व उष्णतावाढीच्या पार्श्वभूमीवर ओझोनचे आवरण वाचवण्यासाठी अधिकाधिक सक्रिय प्रयत्नांची गरज आहे. झाडांची संख्या वाढवली तर ओझोनचा थर वाढू शकतो. प्रत्येकाने वृक्षारोपणाचा संकल्प करून जागतिक ओझोन संरक्षण दिवस साजरा करुया असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.