अर्चना बनगे, प्रतिनिधी
World Tourism Day 2022 : जगातील विविध भागांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने (UNWTO) या दिवसाची सुरुवात झाली. अनेक देशांची पर्यटन मंडळे जागतिक पर्यटन दिनाच्या उत्सवात सामील आहेत. जे आपापल्या शहरांमध्ये, राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी आकर्षक ऑफर सुरू करत आहेत. यंदाचा पर्यटन दिन मात्र खास असणार आहे कारण कोरोना काळानंतर तबब्ल दोन वर्षाने मोठ्या प्रमाणात लोक पर्यटनाला बाहेर पडत आहेत. या काळात अनेक आव्हानांना सामोर जावं लागल आहे म्हणूनच ‘पर्यटन पुनर्विचारासोबत थीममध्ये बदल केलेले आहेत. ते कोणते हे जाणून घेणार आहोत. यंदा जगभरात पर्यटन दिन का साजरा केला जातो. त्याचे महत्व आणि कोणता देश होस्ट करत असतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.
इतिहास काय आहे
आज जागतिक पर्यटन दिवस म्हणजे देशविदेशातील पर्यटनास चालना देण्यासाठी तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात पर्यटनाचं महत्व पटवून देण्यासाठी जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (UNWTO) ने १९९७ मध्ये पहिल्यांदा २७ सप्टेंबर ला जागतिक पर्यटन दिन सुरु करण्यात आला.
कोणता देश होस्ट करत आहे
पर्यटन दिन साजरा करण्याचा उद्देश पर्यटनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे. १९९७ मध्ये यूएनडब्ल्यूटीओ पहिला जागतिक पर्यटन दिवस आंतरराष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला. यावेळी असा निर्णय घेण्यात आला की, दरवर्षी जागतिक पर्यटन दिनाचे यजमान देश वेगळे असतील. यंदाचा यजमान देश इंडोनेशिया हा आहे. इंडोनेशिया हा एक देश आहे जो उत्कृष्ट आदरातिथ्यासाठी ओळखला जातो. पर्यटन हे येथील उत्पन्नाचे प्रमुख साधन मानले जाते.
या वर्षाची थीम काय आहे
दरवर्षी, जागतिक पर्यटन दिनाची थीम पर्यटन पुनर्विचार असते. कोरोना महामारीनंतर आलेल्या बदलांचा सर्वाधिक परिणाम पर्यटनावर झाला. अशा स्थितीत पर्यटनात सहज शक्य तितके नवीन बदल करून या उद्योगाला पुन्हा चालना मिळू शकेल अशा गोष्टींकडे यंदा लक्ष दिले जाणार आहे
Related Posts
Add A Comment