कोल्हापूर : सोयरीक केल्यासारखं जातीचं राजकारण मतदान करताना करू नका. कारण उल्हास पाटील आणि सुजित मिणचेकर यांचा जातीमुळे गेम झाला. राजेंद्र पाटील-यड्रावकर अपक्ष म्हणून निवडून आला आणि गद्दारी केली. अशी सडेतोड टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केली. कुरुंदवाड इथं झालेल्या महाप्रबोधन यात्रेत त्या बोलत होत्या.
पुढे अंधारे म्हणाल्या, “जात आणि धर्माच्या नावावर राजकारणाचे गणित मांडलं जातंय. अपक्ष असला तरी, मंत्रीपद घ्या म्हणून यड्रावकर यांना दिलं होतं. पण निधी मिळाला नाही म्हणून यड्रावकर टाहो फोडत आहेत.”
“यड्रावकर यांना 500 कोटी पेक्षा जास्त निधी दिला होता. पण आता सोयरीक केल्यासारखं जातीचं राजकारण मतदान करताना करू नका. कारण उल्हास पाटील आणि सुजित मिणचेकर यांचे जातीमुळे गेम झाला. यड्रावकर अपक्ष म्हणून निवडून आला आणि गद्दारी केली. आमच्या माणसांनी भिंत पाडली नसती तर भाजपची हिमंत झाली नसती. भाजपने आमच्यावर इंग्रजाची तोडा, फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली.” असेही अंधारे म्हणाल्या.
“राजेंद्र यड्रावकरजी मला भीती नाही म्हणता, मग ब्लॅक कमांडो घेउन का फिरता? यड्रावकर यांना लोकात जायची भीती वाटते, म्हणून समोर येण्याची भीती वाटते. तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या विश्वासाचा घात केला.” असा घणाघात अंधारे यांनी माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर केला.
Related Posts
Add A Comment