प्रतिनिधी,संगमेश्वर
नदीवर लावलेला शेती पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. सदरची घटना खाडी भागातील फुणगूस येथे घडली.आर्यन दिलीप पांगरकर ( वय- 16 वर्ष ) राहणार फुणगूस पवारवाडी असे मयत झाल्या युवकाचे नाव आहे. याबाबत दिलीप पांगरकर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नोंद दिली आहे.
आर्यन दिलीप पांगरकर हा सोमवारी फुणगूस येथील परतर्कोंड नदीमध्ये शेती पंप सुरू करण्यासाठी गेला होता. शेती पंप सुरू करत असताना त्याला शॉक बसला. त्याला ग्रामस्थांनी जाकादेवी येथील खाजगी डॉक्टरांकडे उपचारा करता घेऊन गेले असता तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली असून, अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.
Previous Articleअमित शहा लवकरच कोकण दौऱ्यावर; प्रमोद जठारांची माहिती
Next Article सावंतवाडीत जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन रंगले !
Related Posts
Add A Comment