प्रयाग चिखली वार्ताहर
तिक्ष्ण हत्याराने गळ्यावर, डोक्यावर, पोटामध्ये सुमारे सहा-सात वार करून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या च्या सुमारास वडणगे फाटा येथील एका बंद असलेल्या हॉटेलमध्ये घडली. किरण दिनकर नाईक (वय 38 )राहणार- प्रयाग चिखली असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून घटनेनंतर एक तासाने संशयित आरोपी सुरज जोतीराम आडसूळ रा.निगवे (ता. करवीर)याने करवीर पोलिसात हजर राहून आपणच खून केल्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
घटनास्थळी करवीरचे पोलीस उपअधीक्षक श्री संकेत गोसावी तसेच करवीर चे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंधकर यांनी भेट देऊन पंचनामा व तपासाच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. बंद पडलेल्या हॉटेलच्या शेजारच्या खोलीमध्ये किरण नाईक याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलिसांना सापडला. मारेकऱ्यांने मयत किरणच्या डोक्यावर गळ्यावर छाती पोटावर सुमारे सहा ते सात वार केल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा चालू होता. घटनास्थळी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
मयत किरण हा प्रयाग चिखली येथील दिनकरराव नाईक यांचा मुलगा होता गेल्या काही वर्षांपासूनरात्री उशिरा घरी येणे हे नित्याचेच होते. बुधवारी रात्री संशयित आरोपी सुरज मयत किरण तसेच त्यांचा आणखी एक मित्र हॉटेलचे एका बंद खोलीत बसले होते. यावेळी एका महिलेच्या विषयावरून त्यांच्यात वाद लागला आणि तो एकमेकांवर हल्ला करण्यापर्यंत गेला असल्याचा संशय पोलिसांना आहे. खुनातील संशयित आरोपी हा त्या महिलेच्या गाडीवर ड्रायव्हर असल्याचेही समजते .मयत किरण हा अध्याप अविवाहित असून त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे. सुरज याने कुणाची कबुली दिली असली तरी आणि नेमका खुन कोणी केला? आणि कुणाचे नेमके कारण काय? याचा तपास करवीरचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंधकर हेकरत आहेत दरम्यान खून झालेल्या किरण यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर बुधवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.