आमदार प्रवीण आर्लेकर यांचे आवाहन : तांबोसे-तोरसेत रंगला संगीत समारोह

प्रतिनिधी /पेडणे
संगीतात मोठी शक्ती असून रसिकाच्या कानी संगीताचे सात स्वर ज्यावेळी पडतात त्यावेळी मनाला जो आनंद मिळतो, तो आनंद इतर क्षेत्रातून मिळत नाही, संगीताचे सात स्वर जर एखाद्या आजारी माणसाच्या कानी पडले, तर तो आजारातून बरा होतो एवढी ताकद या संगीतामध्ये आहे. युवकांनी संगीत क्षेत्राकडे वळून आपले भवितव्य घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी तोरसे येथे केले.
श्री गुरुकृपा संगीत संस्था तांबोसे तोरसे कला व संस्कृती संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत समारोहाच्या उद्घाटन प्रसंगाला प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर कला आणि संस्कृती खात्याचे उपसंचालक अशोक परब ,कार्यकारी अधिकारी मिलिंद माटे, तोरसे सरपंच प्रार्थना मोटे, तोरसे जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे, उद्योजक प्रभाकर मोटे , माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर ,पंच सदस्य स्वाती तोरस्कर ,श्री गुरुकृपा संगीत संस्थेचे संस्थापक नाना आसोलकर , मोपा सरपंच सुबोध महाले आदी उपस्थित होते.
कला व संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक अशोक परब यांनी यावेळी बोलताना सांगितले कला आणि संस्कृती खाते वेगवेगळय़ा माध्यमातून कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी आर्थिक सहकार्य करत असतात नाना असोलकर सारखे जे जे÷ संगीत तज्ञ आहेत, ते केवळ पेडणे तालुक्मया पुरती मर्यादित नसून ते गोमंतकाला परिचित आहेत, संगीत नाटकांची मेजवानी आणि संगीत नाटक चालू राहावं यासाठी त्यांचे सदोदित प्रयत्न असतात असे अशोक परब म्हणाले.
यावेळी सूर्यकांत तोरस्कार,सीमा खडपे,स्वाती तोरस्कार,सरपंच प्रार्थना मोटे,नाना असोलकार यांची भाषणे झाली.
मंदार जोशी यांनी स्वागत , प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. उद्घाटन सञानंतर नाना आसोलकर यांच्या शिष्य राधिका कासकर यांनी शास्त्रीत गायन सादर केले.