25-05-2022 ते 31-5-2022
मेष
सगळय़ा प्रकारच्या लाभाचे योग बनत आहेत पण खर्चावर नियंत्रण ठेवले पाहिजे. दुरून एखादा शुभ समाचार मिळू शकतो. तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील लहान वाद मोठे स्वरूप धारण करू शकतात. प्रवास शक्मयतो टाळावा. वैवाहिक जोडीदाराकडून योग्य सल्ला मिळेल. लहान मुलांना जपावे लागेल.
उपाय ः विहिरीमध्ये दोन चमचे दूध टाकावे.
वृषभ
वैवाहिक जीवनामध्ये थोडेफार वाद संभवतात. धार्मिक स्थळाला भेट द्याल. व्यवसायामध्ये प्रगती होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. जमिनीसंबंधी व्यवहार यशस्वी होतील. शेअर्ससारख्या धोका असलेल्या ठिकाणी पैसे गुंतवू नका. शत्रूंचे बळ वाढत आहे. सावध रहावे लागेल. नोकरीमध्ये चांगली घटना घडेल.
उपाय ः वाहत्या पाण्यामध्ये नारळ प्रवाहित करा.
मिथुन
हवामान बदलाचा तब्येतीवर परिणाम होईल. पथ्य सांभाळावे. धनप्राप्ती करता कष्ट करावे लागतील. प्रवासामधून लाभ होईल. ज्ये÷ व्यक्तींशी वाद संभवतात. पैसे उधार देणे टाळावे. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरीत वरि÷ांच्या त्रास जाणवेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. भाग्याची साथ आहे.
उपायः पिंपळाच्या झाडाकडे दिवा लावावा.
कर्क
कुटुंबातील वातावरण चांगले असेल. एखादा छोटेखानी समारंभ होऊ शकतो. बरेच दिवस न भेटलेल्या व्यक्तीशी भेट होऊ शकते. एखाद्या मित्राच्या वर्तणुकीचा त्रास होईल. प्रवासात नुकसान संभवते. वाहन सुख उत्तम आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका. नोकरदारांना चांगली बातमी कळेल. जोडीदाराची साथ असेल.
उपाय ः मनगटावर हिरव्या शाईने स्वस्तिक काढावा.
सिंह
आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वाद वाढू शकतो. पैशांची आवक जेमतेम राहील. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. ज्ये÷ स्त्रीशी वाद होईल. शेअर्समधून लाभ संभवतो. गटबाजी आणि शत्रूंच्या कारवायांमुळे त्रस्त व्हाल. नोकरदार वर्गाला चांगले दिवस आहेत. वैवाहिक जोडीदाराकडून सुखप्राप्ती होईल. वाहन जपून चालवावे.
उपाय ः शिवलिंगावर एक मूठ अखंड तांदूळ अर्पण करा.
कन्या
धनप्राप्तीचे उत्तम योग आहेत. कुटुंबातील व्यक्तींबरोबर आनंद साजरा कराल. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. लहान भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर वाद संभवतो. कागदोपत्री व्यवहारामध्ये चूक होऊ शकते. जमिनीविषयक कामांना गती येईल. शेअर्समधून लाभ संभवतो. वैवाहिक सुख उत्तम राहील. व्यवसायातील चढ-उतारांमुळे खिन्नता वाटू शकते.
उपायः लाजाळूचे झाड घरी लावावे.
तूळ
आरोग्य सुधारेल. घरातील वातावरण बिघडण्याचे योग आहेत. सामंजस्याने समस्या सोडवाव्यात. धनप्राप्ती उशिरा संभवते. प्रवासाचे चांगले योग आहेत. मातेचे सहकार्य लाभेल. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाने चुका होऊ नयेत यासाठी सावध रहावे. व्यावसायिक संबंधांमुळे फायदा होईल. वैवाहिक जोडीदाराबरोबर वाद संभवतात.
उपाय ः आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ घालावे.
वृश्चिक
घरी पाहुण्यांचे आगमन संभवते. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. प्रवासात फायदा होईल. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून फायदा संभवतो. शत्रूंच्या कारवाया थंड पडतील. तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे व्यवसायात फायदा होईल. मोठय़ा यात्रेचा विचार कराल.
उपाय ः मारुतीच्या देवळात तुपाचा दिवा लावावा.
धनु
आरोग्याची एखादी समस्या असेल तर योग्य निदान होऊन समस्येचे निवारण होईल. धनप्राप्ती उत्तम असेल. घरात, मित्र-मैत्रिणींबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर एखादा छोटा समारंभ साजरा कराल. कामानिमित्त प्रवासातून फायदा होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका. नोकरीमध्ये सहकाऱयांचे वर्तन आवडणार नाही. जोडीदाराशी वाद संभवतो.
उपाय ः गुरुवारी हिरव्या रंगाच्या मिठाईचे दान करा.
मकर
उत्तम आरोग्यासाठी प्रयत्न कराल. आत्मविश्वासात वाढ होईल. कौटुंबिक सुख उत्तम मिळेल. भावंडांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. जमिनीचे व्यवहार टाळा. शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका. नोकरीच्या ठिकाणी वाद संभवतो. वैवाहिक जीवनामध्ये अप्रिय घटना घडू शकते. मानसन्मानात वाढ होईल. परदेश गमनासाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळेल.
उपाय ः शनिवारी पिंपळाचे पान तिजोरीत ठेवा.
कुंभ
तुमच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना जास्त होईल. नातेवाईकांबरोबर वेळ घालवाल. कौटुंबिक वातावरण सुधारेल. प्रवासात नुकसान संभवते. शेअर्ससारखी गुंतवणूक टाळावी. नोकरदार वर्गाला एखादी लहानशी चूक महागात पडू शकते. वैवाहिक जीवनात आनंदाची प्राप्ती होईल. मन धार्मिकतेकडे झुकू शकते. तीर्थक्षेत्राला जावेसे वाटेल. लाभाचे योग आहेत. उपाय ः गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी
मीन
बरेच दिवस लांबलेले एखादे काम पूर्ण होईल. कामाच्या व्यापामध्ये व्यस्त असाल. जुनी येणी वसूल करण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. संततीशी वाद संभवतो. नोकरदार वर्गाला कष्टाचे चांगले फळ मिळेल. वैवाहिक जोडीदार तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाही. अचानक धनलाभाचे योग आहेत. मानसन्मान प्राप्ती होईल.
उपाय ः संध्याकाळी दीप दान करावे.