माजगाव भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी
ओटवणे प्रतिनिधी
वेंगुर्ले येथे नाईक जिम अँड फिटनेस यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील ७५ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाच्या कु हेमांगी गजानन मेस्त्री हिने प्रथम क्रमांक पटकाविला. कु हेमांगी मेस्त्री ही चराठा येथील गजानन मेस्त्री यांची कन्या आहे. यापूर्वीही तिने अनेक वेटलिफ्टिंग स्पर्धेत उज्वल यश संपादन केलेले आहे. कु हेमांगी मेस्त्री हिला जिम प्रशिक्षक मंगेश घोगळे, शाळेचे शिक्षक चंद्रशेखर सावंत, भाऊसाहेब चौरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे माजगाव शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार, सचिव लक्ष्मण नाईक, उपाध्यक्ष नारायण कानसे, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.