करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी गावात घरासमोर लावलेल्या ७ लाख ३० हजार रूपये किमंतीच्या नवीन ट्रॅक्टरची चोरी झाली आहे.
याची फिर्याद संग्राम संभाजी पाटील (वय 30) रा. शेलगाव वांगी यांनी करमाळा पोलिसांत दिली आहे. याबाबतची हकीकत अशी की, 15 तारखेला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नवनाथ कोडलकर यांनी ट्रॅक्टर मालक संग्राम संभाजी पाटील यांच्या घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली ट्रॅक्टर लावला होता. मात्र अज्ञात चोरट्यांनी तीन महिन्यांपूर्वीच नवीन आणलेला ट्रॅक्टर रातोरात गायब केला आहे. याबाबत संग्राम पाटील यांनी आपल्या परिसरात सर्वत्र चौकशी केली. मात्र ट्रॅक्टर न सापडल्याने अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टर चोरीला नेल्याचे पोलिसांत तक्रार दाखल आहे. करमाळा पोलिसांनी ट्रॅक्टर चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक प्रवीण साने हे पुढील तपास करीत आहेत.