तृतीयपंथीयांनी व्यक्त केल्या भावना; ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर’वर नोंदणी ; समाजकल्याण विभाग -सायबर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा
प्रतिनिधी/कोल्हापूर
आम्हाला एकत्रित करून आमच्या अडचणी जाणून घेतल्या. आमच्यासाठी असणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत केली. आता आम्ही हक्काने, अधिकाराने, एका नव्या ओळखीने समाजात वावरू शकतो, अशा भावना सोमवारी जिह्यातील तृतीयपंथीयांनी व्यक्त केल्या. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय कोल्हापूर आणि सायबर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथीयांची सामाजिक समावेशकता’ ही एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा सायबर महाविद्यालयात आयोजित केली होती. यावेळी ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर’ या केंद्र सरकारच्या पोर्टलवर जवळपास 50 च्या वरती तृतीयपंथीयांची नोंदणी करण्यात आली. यावेळी 80 च्या आसपास तृतीयपंथी नोंदणीसाठी आले होते.
बीजभाषणात बोलताना हैदराबादमधील तृतीयपंथीयांच्या आधिकारावर राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱया कार्यकर्त्या प्रिया मूर्ती म्हणाल्या, तृतीयपंथीयांची सामाजिक समावेशकता ही गरजेची आहे. तृतीयपंथीयांच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन या घटकांची सद्यस्थिती दयनीय आहे. या घटकाविषयी सातत्याने शासकीय स्तरावर धिक नियोजन व अर्थपूर्ण अशा ठोस कार्यक्रमांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. तृतीयपंथी कार्यकर्त्या नां†दता यांनीही या समुदायाला एक माणूस म्हणून मुख्य सामाजिक प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रातील किंबहुना देशातील सरकारी स्तरावर तृतीयपंथीयांची मा†हती राष्ट्रीय पोर्टलवर एकत्रितपणे भरण्याचा हा जिल्ह्याने एक वेगळा आदर्श घालून दिल्याचे समाजकल्याण विभागाचे उपायुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळाच्या सदस्या मयुरीताई आळवेकर, अॅड. दिलशाद मुजावर यांनी राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱया उपक्रमांचा आढावा घेतला.
सकाळी 10 ते 2 यादरम्यान तृतीयपंथीयांची नोंदणी करण्यात आली. यावेळी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून येणाऱया अडचणी दूर केल्या. तर दुपारी दोननंतर व्याख्यानांचे आयोजन केले होते. कार्यशाळेची सुरुवात डॉ. दीपक भोसले यांच्या प्रास्ताविकाने व प्राध्यापक सा†चन जगताप यांच्या सुमधूर बासरी, विद्यार्थी प्रतिनिधी वर्षा भोसले यांच्या प्रार्थना गायनाने झाली.
सूत्रसंचालन डॉ. सुरेश आपटे, डॉ. कालिंदी रानभरे यांनी केले. आभार प्रदर्शन समाज कल्याण निरीक्षक डी. एस. पाटील यांनी केले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सायबरचे व्यवस्थापकीय सचिव डॉ. रणजित शिंदे, डॉ. सानिया राजपूत, डॉ. दुर्गेश वळवी, डॉ. बी. एन. पाटील, डॉ. एस. व्ही. शिरोळ, डॉ. टी. व्ही. जी. शर्मा, डॉ. पी. एस. रणदिवे, समाजकल्याणचे निरीक्षक प्रिया पाटील, सचिन कांबळे यांचे सहकार्य लाभले.
तृतीयपंथीय घेणार सरकारी योजनांचा लाभ
विविध सरकारी योजनांपासून तृतीयपंथीय वंचित राहत हेते. मात्र ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर’ या पोर्टलवर सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसह नोंदणी केल्यानंतर तृतीयपंथीय म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे. त्यामुळे ते सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकणार आहेत.