प्रतिनिधी / बेळगाव
अलतगा येथील लक्ष्मी देवीच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळय़ाची शुक्रवारी जल्लोषात सांगता झाली. भंडाऱयाच्या उधळणीत व पारंपरिक धनगरी ढोलवादन करत गावातील प्रत्येक गल्लीतील महिलांनी देवीची ओटी भरली. गावातील महिलांसोबतच माहेरवासिनी या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. अलतगा गावच्या ग्रामस्थांनी एकजुटीने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. तब्बल 72 वर्षांनी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
शिरसंगी ता. आजरा येथून देवीची मूर्ती आणण्यात आली. जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, आजरा जि. पं. सदस्या सुनीता रेडेकर, युवानेते आदित्य रेडेकर, देवस्थान पंच कमिटीचे उपाध्यक्ष संजय पाटील, ग्रा. पं. सदस्य चेतक कांबळे यांच्या उपस्थितीत आजरा येथे पूजन करण्यात आले.
देवीची मूर्ती गावात आणताच गावातील सर्वात ज्येष्ठ दाम्पत्य भरमा सिद्राय घुग्रेटकर व गंगुबाई घुग्रेटकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील व कंग्राळी खुर्द गावचे ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या उपस्थितीत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
कोल्हापूर येथील कीर्तनकार धारवाडकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. वाजत गाजत प्रत्येक गल्लीमधील नागरिकांनी देवीची ओटी भरली. या पुढेही गावात सुख-शांती व आरोग्यपूर्ण वातावरण राहो, अशी मागणी देवीसमोर करण्यात आली. देवीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भक्तीपूर्ण वातावरणात मूर्ती प्रति÷ापना सोहळय़ाची सांगता झाली. कोणतेही विघ्न न येता संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडल्याबद्दल देवस्थान कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडूम यांनी ग्रामस्थांचे आभार मानले