बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (व्हीटीयू) ने अधिसूचित केले आहे की २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी बेंगळूरमधील तीन आणि अन्य तीन असे राज्यातील सहा अभियांत्रिकी महाविद्यालयांची संलग्नता मागे घेण्यात आली आहे.
महाविद्यालयांमध्ये अल्फा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, इस्लामिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आणि बीटीएल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (सर्व बेंगळूर), शेख कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (बेळगाव), एकलव्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (चामराजनगर) आणि श्री विनायक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ( कोलार) अशी मान्यता रद्द करण्यात आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची नावे आहेत.
विद्यापीठाने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतर संलग्न महाविद्यालयांमध्येपुन्हा प्रवेश दिला जाईल. “या महाविद्यालयांमध्ये नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना याची दखल घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर या संस्थांमध्ये प्रवेश घेऊन कोणताही विद्यार्थी पुढे गेला तर विद्यापीठ त्याला जबाबदार राहणार नाही,” असे VTU ने जारी केलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे.