प्रतिनिधी / सातारा
कोळे ता. कराड येथे जयश्री किराणा नावाचे दुकानाच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील २0 हजाराची रोकड लंपास केली. ही घटना मंगळवार, दि. २४ रोजीच्या रात्री घडली. या प्रकरणी २५ ते ३० वयोगटातील अज्ञात चोरट्याविरुध्द कराड ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
या बाबत मंदाकिनी अधिकराव मोरे वय ५४ रा. कोळे यांनी फिर्याद दिली आहे. कोळे येथे मोरे यांच्या मालकीचे जयश्री किराणा दुकान आहे. मंगळवार दि. २४ रोजी सायंकाळी दुकानातील कामगाराने नेहमीप्रमाणे २0 हजाराची रोकड मोजून गल्ल्यात ठेवली. दुकानाला कुलूपे घालून चाव्या मोरे यांच्याकडे देवून तो निघून गेला. रात्री पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून २५ ते ३0 वर्षे वयाच्या अज्ञात चोरट्याने दुकानातील गल्ल्यातून २0 हजाराची रोकड लंपास केली. हा प्रकार सकाळी उजेडात आला. चोरटा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे.