प्रतिनिधी/ रत्नागिरी
बुडो मार्शल आर्ट असोसिएशन रत्नागिरी यांच्यावतीने 6 व्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होत़े या स्पर्धा नुकत्याच शहरातील दामले विद्यालय येथे पार पडल्य़ा स्पर्धेचे उद्घाटन ऍड. सुरज बने यांच्याहस्ते करण्यात आल़े जिल्हय़ातील 180 खेळाडूनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत चमकदार कामगिरी केल़ी
व्हाईट बेल्ट ग्रृप, यलो बेल्ट ऑरेंज बेल्ट, ग्रीन बेल्ट ग्रृप, ब्लू बेल्ट, ब्राऊन बेल्ट, ब्लॅक बेल्ट अशा ग्रृपमधून स्पर्धा घेण्यात आल़ी यामध्ये रोहित सावंत, प्रज्योत किनरे, सिया तोडणकर, आर्यन वाडेकर, स्वरूप पाडाळकर, शांभवी पोटफोडे, नुपूर पवार, हियांशी चंद्रा, स्वप्नील कोकजे, श्रावणी शिंदे, अनामिका चव्हाण, प्रेम बेग, वैभव कदम, तेजस जाधव, स्पर्धा पंच म्हणून काम पाहिल़े तर तंत्रनिर्देशक म्हणून अरूण बेग व रितेश बेग यांनी काम पाहिल़े