ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत कोरोना बाधितांनी 6 लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासात दिल्लीत 1 हजार 575 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 61 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 01 हजार 150 वर पोहचली आहे. यामधील 18,753 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2020/12/Screenshot_20201210-2131002.png)
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 3, 307 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 5 लाख 72 हजार 523 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 9,874 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 70 लाख 05 हजार 476 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 29,441आरटीपीसीआर टेस्ट आणि 34,628 रैपिड एंटिजेन टेस्ट सोमवारी एका दिवसात करण्यात आल्या आहेत.