ऑनलाईन टीम / अक्कलकोट
दिपावलीत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री धनंजय मुंडेंकडून स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले असुन धनंजय मुंडे नाच गाणं करण्यात मग्न असल्याचे म्हटले आहे.
दिपावली सणा दरम्यान धनंजय मुंडेंकडून स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात लावणीसह विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या ही नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात होता. तेव्हा राज्यात विविध समस्या असतांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सामाजिक भान विसरल्याची टीका करण्यात आली होती.
यावरुन फडणवीस यांनीही टीका करताना म्हणाले की “अरे वेड्या, भारतीय जनता पार्टी मुंबईच्या मातीतून उभी राहीली आहे. २ वरुन ३०२ वर गेलेली हा पार्टी आहे. चार-सहा खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगण्याचं कारण नाहीये. आम्हाला मातीत गाड़णारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, एसटी संप सुरू आहे आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत, हे आम्हाला सांगून राहिले मातीत गाडून टाकू, भाजपचा कार्यकर्ता हा देखील तुम्हाला पुरेसा आहे, अशा वल्गना करू नका, सामान्य माणसाच्या हिताचे काय काम आपण करू शकतं हा प्रयत्न तुम्ही करा”, असं फडणवीस म्हणाले.