प्रतिनिधी/ पणजी
नु शि नलीनी नाफ्ता वाहू जहातून काढण्यात अलेला 15 कोटींचा नाफ्ता 36 लाख रुपयांना विकून तो देशाबाहेर नेण्यात आला आहे. यात स्थानिक आमदार मंत्री मिलींद नाईक यांचा हात आहे. त्यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी कॉंग्रेसने काल पत्रकार परिषद घेऊन केली. या सर्व प्रकारचा एनआयए तसेच डिफेन्स इन्वेस्टीगेशन एजेसीच्या मार्फत चौकशी करुन या प्रकरणात जबाबदार असलेल्यावर कारवाई करावी अशी मागणी कॉंगेसचे प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी केली.
गोव्यात ही नाफ्ता वाहतूक जहाज आली यात किती नाफ्ता होता? हे जहाज गोव्याच्या हद्दीत दाखल कसे झाले याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कॉगेसने निवेदन दिले होते. मुख्यामंत्र्यांनी फक्त आश्वासने दिली. या प्रकरणा अजून चौकशी करण्यात आलेली नाही. तसेच एमपीटी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही, असे संकल्प आमोणकर म्हणाले.
या जहाजातून नाफ्ता काढून तो गणेश बेंजाप्लास्ट या फॅक्ट्रीत सावठवून ठेवण्यात आला होता. त्यानंतर येथून हलवून अन्य एका जहातून यु ए ई देशाकडे रवाना करण्यात आला. या प्रकरणात मुख्यमंत्री, मंत्री मिलींद नाईक तसेच डीजी शिपींग यांचा हात असल्याचा संशय आहे. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे संकल्प आमोणकर म्हणाले.
नु शि नलिनी जहाजामध्ये सुमारे 15 कोटी रुपयांचा अडीच हजार मेट्रीक टन नाफ्ता होता पण अन्य देशात तो फक्त 36 लाख रुपयांनी विकला आहे. प्रत्येकक्षात दिड रुपये प्रती लिटर या किंमतीत हा नाफ्ता विकण्यात आला आहे. स्वःताच्या फायद्यासाठी हे स्थानिक आमादार मिलींद नाईक यांनी केले आहे. गणेश बेंजाप्लास्ट येथून यु ए ई येथे नाफ्ता हलविण्यासाठी छूप्या पद्धतीने निविदा मागण्याविण्यात आल्या होते. मुंबई व गुजरात येथून दोने कंपन्यानी या निवेदा प्रकीयेत भाग घेतला होता त्यापैकी मुंबई येथील युनायटेड फ्युचरीस्ट्रीक टेड या कंपनील ही कंत्राट देण्यात आले. तर गुजारातमधील कंपानीला बाहेर काढण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या सोबत काँग्रेसचे अमनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, ऊर्फान मुल्ला व अन्य उपस्थित होते.