ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात अल्पवयीन मुलेच नव्हे तर वयोवृद्धांमध्येही पॉर्न पाहणाऱयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ते हिंसक होत आहेत, असा अजब दावा वकील कमलेश वासवानी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या नवीन प्रतीज्ञापत्रात केला आहे.
वासवानी यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, भारतात 3 कोटी मुले आणि 7 कोटी वयोव़ृद्ध पॉर्न साईट्स पाहतात. त्यामुळे ते हिंसक होत आहेत. पॉर्न पाहण्याची सवय ही दारू व ड्रग्जप्रमाणे आहे. त्याच्यावर तात्काळ उपाययोजना करावी. इंटरनेट-कायदा अभावी पॉर्न व्हिडिओला प्रोत्साहन मिळत आहे. मार्केटमध्ये 20 लाख पॉर्न व्हिडिओ उपलब्ध आहेत. मुले सहजपणे हे व्हिडिओ पाहू शकतात. त्यामुळे मुलांच्या मनावर मोठा परिणाम होत आहे.
पॉर्नच्या सवयींमुळे मुलांमध्ये हिंसकता निर्माण होत आहे. त्यातून बलात्कारासारखे प्रकार वारंवार घडत आहेत. सुप्रीम कोर्टाने तीन वर्षापूर्वी आदेश देऊनही सध्या इंटरनेटवर पोर्नोग्राफीसंबंधी कंटेट इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्या मधून लैंगिक आणि हिंसात्मक कंटेट समोर आणला जात आहे. त्यावर सुप्रीम कोर्टाने तात्काळ दखल घेत सरकारला आदेश द्यावेत, अशी मागणी वासवानी यांनी प्रतिज्ञापत्रात केली आहे.