वृत्तसंस्था/ बेनडिगो
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ऍतीस कॅनबेरा आंतरराष्ट्रीय एटीपी पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या प्रजनीश गुणेश्वरनने आपला एकेरीचा सामना जिंकून दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला पण भारताच्या रामकुमार रामनाथनचे आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले.
162, 480 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या एटीपी चँलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या प्रजनीश गुणेश्वरनने ऑस्ट्रेलियाच्या कुबलेरचा 7-5, 6-3 असा पराभव करत विजयी सलामी दिली. प्रजनीशने हा सामना दीड तासात जिंकला. दुसऱया एका सामन्यात फिनलँडच्या रूसुव्होरीने भारताच्या रामकुमार रामनाथनवर 3-6, 6-2, 6-3 अशी मात करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.