पंकजा मुंडेंचे ट्विट : पराभव मान्य
ऑनलाइन टीम / बीड :
बीड जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा रोवला गेला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवकन्या शिरसाट आणि उपाध्यक्षपदासाठी बजरंग सोनवणे यांनी उमेदवारी दाखल केली होती. या दोन्ही उमेदवारांना शनिवारच्या मतदानानंतर विजयी घोषित करण्यात आले आहे.
दरम्यान, अध्यक्ष निवडणुकीअगोदरच भाजपने बीडमध्ये माघार घेतली आहे. शिवसेनेने पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे पंकजा मुंडेंनी पराभव मान्य असल्याची भूमिका जाहीर केली.
पंकजा मुंडे यांनी ट्विट करून सांगितले, राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे रात्रीच बीड जिह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत.