बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर विमानतळावरून प्रवास करणारे प्रवाशी लवकरच सॅन फ्रान्सिस्कोला नॉन-स्टॉप उड्डाण करु शकतील. दरम्यान एअर इंडियाने बेंगळूर आणि सॅन फ्रान्सिस्को दरम्यान थेट उड्डाण होणार असल्याचे जाहीर केले आहे.
आठवड्यातून दोनदा उड्डाण करणार्या या नव्या विमानाची सुरुवात ११जानेवारी २०२१ पासून सुरू होणार आहे. जगातील दोन टेक हब – मूळ सिलिकॉन व्हॅलीला जोडणारी बेंगळूर आणि अमेरिकेदरम्यानची ही पहिली नॉन-स्टॉप फ्लाइट असेल. आणि सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया, बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (बीआयएएल) बुधवारी एका निवेदन काढत ही माहिती दिली.
बुधवारीपासून एअर इंडियाने तिकिट बुकिंग सुरू केले आहे. दरम्यान बेंगळूर आणि सॅन फ्रान्सिस्को दरम्यानची पहिली नॉन-स्टॉप फ्लाइट बेंगळूरमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ विमानतळासाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि त्याचे रुपांतर भारताचे नवीन प्रवेशद्वार होईल.