नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या माजी ऍटर्नी जनरल आणि घटना कायदेतज्ञ सोली सोराबजी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. कोरोना विषाणू संसर्गानंतर त्यांना दक्षिण दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोराबजी यांच्या कुटुंबीयांनीच त्यांच्या निधनाची माहिती दिली. निधनसमयी ते 91 वर्षांचे होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रात 1930 मध्ये झाला. राम जेठमलानी देशाचे कायदामंत्री असताना सोली सोराबजी अटर्नी जनरल होते. सोराबजी यांनी 1989 ते 1990 आणि त्यानंतर 1998 ते 2004 या काळात भारताचे ऍटर्नी जनरल म्हणून काम पाहिले होते.
…………….