बेंगळूर/प्रतिनिधी
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोलॉजी (निम) ने राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. जागतिक मानसिक आरोग्य दिनाची दरवर्षी एक वेगळी थीम असते. यावर्षीची थीम ‘सर्वांसाठी मानसिक आरोग्यः ग्रेटर इनव्हेस्टमेंट, ग्रेटर अॅक्सेस’ अशी आहे.
ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या रोखण्यासाठी एक खास वेब पोर्टलही सुरू करण्यात आले आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो-सायन्सेसने ४० बेडचे सरकारी निवासी आरईसी डिमेंशिया केअर सेंटर देखील जाहीर केले.
नवी दिल्लीची रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (आरईसी) यासाठी आर्थिक सहकार्य करणार आहे.
सोल्युशन्स कन्सल्टिंग सेंटरचे माजी संचालक डॉ. चंद्रशेखर यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी राजेश्वरी चंद्रशेखर यांच्या स्मरणार्थ एक कोटी रुपयांची देणगी दिली. ही रक्कम केंद्राच्या कामकाजामध्ये आणि देखभालीसाठी खर्च केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे सचिव आर. सुब्रमण्यम, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्थेचे संचालक डॉ. वीरेंद्र मिश्रा आणि निमहंसचे कुलसचिव डॉ. शंकरनारायण राव यांनीही या ऑनलाइन कार्यक्रमात भाग घेतला.