ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 283 नवीन रुग्ण सापडले. तर आज 5 रुग्ण दगावले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,40,007 इतकी झाली आहे. आजच्या दिवशी 297 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7,18,955 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत आज 38,703 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 87,45,957 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
मुंबईत आज दिवसभरात 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 930 इतका झाला आहे. सध्या रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1,2 हजार 057 दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.4 टक्के पर्यंत खाली आला आहे. नव्या रुग्णांपेक्षा आज बरे होणारे रुग्ण अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 टक्के पर्यंत गेले आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 2,686 हजारांवर आला आहे.
कोरोना नियंत्रणात आल्याने मुंबईत सक्रिय कंटेंटमेंट झोन ची संख्या शुन्य झाली आहे. सीलबंद इमारतींची संख्या ही कमी होऊन 24 पर्यंत खाली आली आहे. गेल्या 24 तासांत 2 हजार 020 अति जोखमीचे संपर्क समोर आले असून 751 जणांना कोविड काळजी केंद्र 1 मध्ये दाखल करण्यात आले आहे.