प्रतिनिधी/महाड
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ काल रात्री 9 च्या सुमारास दरड कोसळली होती.त्यामुळे महामार्ग ठप्प असून ड बाजूला करण्याचे काम अद्यापही सुरु आहे. १२ तास उलटून गेले तरी राष्ट्रीय महामार्ग ठप्प आहे. याचा फटका अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनचालकाना बसला आहे. दोन्ही बाजूंनी वहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत.
मुसळधार पाऊस आणि काळोखामुळे माती हटवण्यास अडचणी येत होत्या. सकाळपासून हे काम युध्दपातळीवर सुरु आहे. दरम्यान , पुढील काही वेळात दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत होइल असे सांगण्यात आले.