चांगले विचार, चांगला संकल्प हाच खरा दैवी गुण…. पूर्वार्ध
बुध. दि. 1 ते 7 जानेवारी 2020
देवदर्शन व मनोरंजनासाठी काहीजण ट्रीपला गेले होते. सर्वजण उत्साही व आनंदी होते. त्यातही काहीजणी सहज बोलल्या तरी हसून बोलल्यासारख्या वाटायच्या, त्यांच्यामुळे गाडीतील वातावरण उत्साही व आनंदी होते तर काही जण हिमालयाचे ओझे डोक्मयावर असल्यासारखे, जगातील सारी संकटे आपल्याकडेच आहेत अशा आविर्भावात एकदमच गंभीर होते. विचार चांगले ठेवा व उत्साही रहा. देवादिकांसह कुणालाही संकटे चुकलेली नाहीत. पण तेच तेच विचार मनात घोळवत ठेवल्यास व सतत त्याचाच विचार केल्यास अकाली वृद्धत्व येते व तुमचे वय कमी असले तरी वयस्कर दिसू लागतो पण जर आनंदी व होकारात्मक विचार असतील, तुमचा चेहरा प्रफुल्लीत असेल तर वयदेखील लहान दिसू लागेल. संकटे का येतात, त्यावर काय तोडगा करावा लागेल, याचा विचार करून त्यावर मात करा. ज्या मुद्यावर मतभेद असतील तेवढय़ापुरतेच वाद करावेत, पण ‘वडाची साल पिंपळाला’ जोडून ‘पराचा कावळा’ करू नये. अशातूनच कटुता वाढत जाते.त्यासाठीच विचार चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. शत्रू हे प्रत्येकाला असतात. समोर गोड बोलणारे व मागून टीका टिप्पणी… निंदानालस्ती करणारे बरेच जण असतात. यांना फुकटचा उपदेश करायला काय जाते आमची संकटे आम्हाला माहीत आहेत, आमचे संकट हे दूर करणार आहेत काय, असा नैराश्यवादी मतप्रवाहदेखील व्यक्त करतात. जे एखाद्याचा पाय ओढायचा प्रयत्न करतात ते त्याच्यापेक्षा नक्कीच खाली असतात व आज ना उद्या त्यांच्या कर्माचे फळ त्यांना मिळणारच हे लक्षात ठेवावे. देव कधीही कुणावर अन्याय करीत नाही, प्रत्येकाच्या पाप-पुण्यानुसार व त्याच्या कर्मानुसार त्याचे बरे-वाईट फळ त्याला देत असतोच. मन हाच अंतरात्मा आहे. त्याला देवत्व बहाल करायचे की राक्षस योनित ढकलायचे ते आपल्यावर अवलंबून असतं. चांगला विचार केलात तर सारे जग तुमच्यावर प्रेम करू लागेल व अनिष्ट विचारांचा पगडा असेल तर कुणीही तुम्हाला जवळ करणार नाही. काही ठिकाणी गेल्यावर तेथे प्रसन्न वाटते तर काही ठिकाणी एक क्षणभरही थांबावेसे वाटत नाही, त्याच न्यायानुसार काही व्यक्ती घरी आल्या की घरचे वातावरण एकदम आनंदी व उत्साही होते तर काही जणांच्या आगमनाने वातावरण एकदम सुतकी अथवा निरुत्साही होते. घर, संस्था, मंगल कार्यालये, सोसायटय़ा, बँका, कार्यालये, असोत अथवा एखादा रस्ता असो, कोठेही पहा याचा अनुभव पदोपदी येत असतो. या रस्त्यावर किती छान वाटते तर काही रस्त्यावर भगभग वाटते. असे का होते याचा कुणी विचार करीत नाहीत. सतत रडणारी मुले एखाद्या घरात एकदम शांत असतात तर काही घरात अथवा स्थळी गेल्यावर एकदम रडू लागतात. कुत्री, मांजर, पशू, पक्षी, यांच्या बाबतीतही हे अनुभव येत असतात. रस्त्यावरून जाताना काहीं जणांना पाहिल्यावर बरे वाटते तर काहीजणांना विषयी घृणा व तिरस्कार वाटतो. या साऱयांचा संबंध पुनर्जन्माशी व आपल्या बऱया वाईट विचारांशी असतो. अवतीभोवतीचे वातावरण कसे ठेवायचे ते आपल्या हातात असते. सतत नकारात्मक विचारांचा पगडा असेल तर वातावरण नक्कीच बिघडते.
मेष
राशीस्वामी मंगळ अष्टमात आहे. घर, जागा, प्लॉट, दुकान वगैरेसाठी प्रयत्न करा. काम होईल. सहा ग्रह भाग्यात आहेत. भावंडांच्या बाबतीत मतभेद शक्मय. नोकरी व्यवसाय व घरगुती बाबी यांची सरमिसळ करू नका. काही प्रकरणांमुळे असलेली नोकरी बदलण्याचा प्रसंग येईल. वास्तू व आर्थिक बाबी या बाबतीत काही तरी महत्त्वाच्या घटना घडतील. भाजणे, कापणे, होरपळणे यापासून सांभाळावे. मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्यावी लागेल.
वृषभ
मंगळ बलवान अवस्थेत सप्तमात आहे. प्रॉपर्टीच्या व्यवहारास अनुकूल काळ. वादविवाद करणाऱयापासून दूर रहाणे चांगले. काही जणांच्या हस्तक्षेपामुळे प्रत्येक गोष्टीत संघर्षानेच यश मिळवावे लागेल. मुलांच्या हौशी तसेच ड्रायव्हर लोकांच्या चुकीमुळे एखादे प्रकरण अंगलट येईल. व्यवसाय असेल तर हिशोब चोख ठेवावेत.
मिथुन
सहाव्या मंगळाचे सहकार्य उत्तम आहे. त्यामुळे सर्व कार्यात नेत्रदीपक यश मिळवाल. पण स्वत: प्रयत्न केलात तरच हे शक्मय आहे. सप्तमात सहा ग्रह एकत्र आहेत. कोर्टकचेरीच्या कामात गुंतला असाल तर काळजी घ्यावी लागेल. भागीदारी व्यवसायात काही तरी गडबड गोंधळ होईल. कुणाच्या जामिनकी अथवा मध्यस्थी प्रकरणात पडू नका. आर्थिक स्थिती मात्र चांगली राहील.
कर्क
मंगळ पंचमात शुभ अवस्थेत आहे. या काळात पुत्रसंतती झाल्यास मातापित्याचे भाग्य उजळेल. वारंवार प्रवास योग येतील. पण आगीशी खेळ करणे टाळा. परस्पर नोकरी व्यवसायात महत्त्वाचे बदल होतील. काही आकस्मिक प्रकरणे घडून जागा सोडण्याचा विचार कराल. क्षुल्लक कारणावरून वादावादी होईल, पण त्याचे परिणाम मात्र अनंतकाळ राहतील. त्यासाठी जपावे. अति दूरवरचे अनोळखी प्रवास टाळावेत.
सिंह
चतुर्थात बलवान मंगळ बसलेला आहे. राजेशाही वृत्तीच्या लोकांशी संबंध येईल. सहाव्या स्थानी सहा ग्रहांची बैठक आहे. कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरी व्यवसायात मुद्दाम काहीजण पडेल ती कामे करण्यास सांगतील. कोणतीही गुंतवणूक करताना सावध रहा. काही बाबी नुकसानकारक ठरू शकतील. हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण होईलच असे नाही.
कन्या
मंगळ बलवान असल्याने अत्यंत अवघड कामे सहज करून दाखवाल, पण चंचलपणा मात्र सोडावा लागेल. काही मित्रांच्या संगतीने खाणे, पिणे, चैन करणे याकडे ओढा वळेल. ग्रहमान संमिश्र आहे. त्यामुळे स्वभावात वैचित्र्य येण्याची शक्मयता आहे. अचानक मोठे लाभ संभवतात. नातेवाईकांच्यासह वागण्यामुळे मोठे गैरसमजही निर्माण होतील. महत्त्वाचे निर्णय घेताना काळजीपूर्वक वागावे.
तूळ
धार्मिक कार्याच्या दृष्टीने चांगले योग. माता-पिता व नोकरी व्यवसायावरच्या दृष्टीने जरा अडचणीचा ठरेल. शुक्र, हर्षलचा योग प्रेमप्रकरणे निर्माण करील. मोठा धनलाभही घडवील. गुरु, शनि योगामुळे महत्त्वाच्या मुद्यावर निर्णायक निर्णय घ्याल. सहा ग्रहांची युती आहे. प्रवासात अपघात वगैरेची शक्मयता.
वृश्चिक
सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील, या भ्रमात राहू नये. प्रयत्न करूनही यश मिळेलच असे नाही. सहा ग्रह एकत्र आहेत. आर्थिक बाबतीत सांभाळावे, धनलाभ झाला तरी हाती पैसा टिकेलच असे नाही. प्रेमप्रकरणे असतील तर जपा. मित्रमंडळीकडून सहकार्य या बाबतीत चांगले योग. प्रवासात धोका व सासरच्या लोकांशी मतभेद होतील.
धनु
राशीतील अनेक ग्रह काय गोंधळ घालतील सांगता येणार नाही. झाला तर कोटय़धीश नाहीतर रस्त्यावर, असे या योगाचे फळ असते. सावधानता बाळगा पण नोकरी व्यवसाय अथवा धनलाभाची एखादी संधी आपोआप चालून आली तर ती सोडू नका. त्यातच तुमचे भाग्य उजळू शकते. प्रवासात असताना वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. तसेच नादुरुस्त वाहन वापरण्याचे टाळा.
मकर
व्ययस्थानी सहा ग्रहांची युती हा योग चांगला मानला जात नाही. मोठे खर्च, बदनामी, शत्रुत्वाला प्रोत्साहन देणारे ग्रहमान आहे. नोकरी व्यवसायासंदर्भात महत्त्वाचे फेरबदल संभवतात. कौटुंबिक बाबतीत नव्या घडामोडी. वैवाहिक जीवनात वादावादीची शक्मयता आहे. कोर्टमॅटर व इतर किरकोळ गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ
धनलाभ, नावलौकिक व आरोग्याच्या दृष्टीने ग्रहमान शुभफलदायी ठरेल. सहा ग्रहांची युती लाभात हा अत्यंत फायदेशीर योग आहे. शुक्र, हर्षलचा योग शत्रू घराण्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याची शक्मयता. आर्थिक समस्या या आठवडय़ात सुटू शकतील. बराच काळ खोळंबलेले एखादे मोठे काम होईल.
मीन
संततीच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटना घडतील. अत्यंत दशम स्थानात सहा ग्रह आहेत. नशिबाने साथ दिल्यास मोठी धनप्राप्ती होईल. प्रेमप्रकरणामुळे कौटुंबिक जीवनात कोलाहल माजेल. वास्तुसंदर्भात शुभ अनुभव. पडझड, अपघात, मोठे खर्च याची शक्मयता असल्याने काळजी घ्यावी. अनोळखी व्यक्तींना गाडीत लिफ्ट अथवा थारा देऊ नका.