गफहमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई / प्रतिनिधी
नक्षलवादी कारवायांवर अंकुश प्रस्थापित करण्यासाठी छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्पेशल पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे गफहमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांच्या बैठकीत स्पष्ट केले.
हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिह्याचा दौरा केला होता. त्यावेळी निदर्शनास आलेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी शिंदे यांनी नुकतीच मंत्रालयातील आपल्या दालनात एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीला अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) राजेंद्र सिंह, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, सार्वजनीक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, पुण्याचे पोलिस आयुक्त व्यंकटेशम, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता सुनिल कुशीरे यांच्यासह गफह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गडचिरोली जिह्यातील रस्ते आणि पुलांची जी कामे रखडली आहेत ती मार्गी लावण्यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या धर्तीवर विशेष तुकडय़ा स्थापन कराव्यात. त्यात 30 टक्के सुरक्षारक्षक आणि 70 टक्के अभियंत्यांची भरती करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले.
’नेटवर्क‘साठी विशेष प्रयत्न
बीएसएनएलची आर्थिक कोंडी सुरू असल्याने 103 प्रस्तावित टॉवर्स उभारणीतला अडथळा दूर करणे, भारत नेटचे ऑप्टिकल फायबरचे जाळे विस्तारल्यानंतर पुढील काम खासगी कंपनीमार्फत मार्गी लावणे, छत्तीसगडच्या धर्तीवर मोबाईल नेटवर्कसाठी ‘संचार क्रांती’ योजना आणि ‘प्रसारभारती’च्या परवानगीने ‘व्हाईट स्पेस बँण्ड’चे खासगी नेटवर्क उभारणी करणे आदी पर्यायांबाबत बैठकीत चर्चा झाली.